आज, गुंतवणूकदारांचे 14,000 कोटींचे नुकसान

मुंबई :सुरवातीला रशिया आणि युक्रेन त्यानंतर इस्त्राईल- हमास आणि आता इराण-इस्त्राईल यांच्यातील युद्धाचा प्रभाव जागतिक पातळीवर पडताना दिसत असून भारतीय शेअर बाजारावर देखील या युद्धाचा परिणाम होताना दिसला. या युद्धामुळे मुंबई शेअर(BSE) बाजार आणि राष्ट्रीय शेअर(NSE) बाजारातील निर्देशांक चांगलेच हलताना दिसत आहेत. सोमवारच्या पहिल्याच दिवशी मुंबई शेअर बाजार(BSE) आणि राष्ट्रीय शेअर बाजारातील(NSE) निर्देशांकात घसरन बघायला मिळाली. राष्ट्रीय शेअर बाजार म्हणजेच निफ्टी 200 अंकाच्या पडझडीसह 22315.20 पर्यंत पोहोचला होता आणि आज मंगळवारी 16 एप्रिलला देखील बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण दिसून आली. शेअर बाजाराचे दोन इंडेक्स आज लाल रंगात न्हाऊन निघाले. आज सेन्सेक्स 456 अंकांनी तुटला त्याच बरोबर निप्टी 22,150 च्या खाली आल्याने गुंतवणूकदारांचे 14,000 कोटी रुपयांचे नुकसान झाले . शेअर बाजारात गुंतवणूक करताना गुंतवणूकदारांनी काळजी घेण्याचा सल्ला तज्ञांनी दिला आहे डोळे झाकून गुंतवणूक करू नका असा सल्ला देखील देण्यात आला आहे.

![]()














