डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या घोषणेमुळे जगभरातील बाजारपेठांमध्ये खळबळ

वृत्तसंस्था : ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बमुळे शेअर बाजारात अक्षरशःहाहाकार उडाला.कोरोना महामारीनंतर आज (सोमवारी) शेअर बाजारात मोठी घसरण पहायला मिळाली. सेन्सेक्स 3900 तर निफ्टी 1200 अंकांनी कोसळले.ज्यामुळे गुंतवणूकदारांचे पुन्हा मोठे नुकसान झाले आहे.शेअर बाजाराच्या घसरणीचे प्रमुख कारण म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्या ‘टॅरिफ बॉम्ब’ धोरणामुळे जागतिक बाजारपेठेत खळबळ उडाली आहे. या टॅरिफ धोरणाचा थेट परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाला आहे. या धोरणांमुळे आयात-निर्यातीवर परिणाम होण्याची भीती असल्यामुळे अनेक कंपन्यांचे शेअर्स घसरले. विशेषतः बँकिंग, ऑटोमोबाईल आणि आयटी क्षेत्रातील शेअर्सवर मोठा दबाव दिसून येत आहे.सोमवारी बाजार उघडताच गुंतवणुकदारांमध्ये मोठी घबराट पसरली.

त्याचा परिणाम शेअर बाजारावर दिसून आला.ही घसरण भारताबरोबर आशियाई बाजारपेठेत दिसून आली.अनेक देशांच्या शेअर बाजारात कोट्यवधी रुपयांची राख-रांगोळी झाली. भारतीय शेअर बाजार गुंतवणूकदारांचे 19 लाख कोटी रुपये बुडाले आहेत. त्यानंतर सोशल मीडियावर याबाबत मिम्स तयार होत असून ते मोठयाप्रमाणात व्हायरल होत आहेत.
दिवस सुरू झाला अन्…
निफ्टीमध्ये 1100 अंकांची पडझड पाहायला मिळाली. निफ्टीचा कारभार 21800 अंकावर सुरु झाला. तर दुसरीकडे सेन्सेक्समध्ये जवळपास 4000 अंकांची पडझड होईल असा अंदाज होता मात्र बाजारात कारभार सुरु झाला तेव्हा तो 3915 अंक घसरणीसहीत सुरु झाला. आज दिवसभाचा कारभार सुरु झाला तेव्हा सेन्सेक्स 71900 अंकावर होता. बँक निफ्टीमध्ये 2000 अंकांची पडझड दिसून आली. निफ्टी मिड कॅप 100 इंडेक्समध्ये 3400 अंकांची पडझड झाली असून तो सध्या 47249 च्या आसपास आहे. इंडिया व्हीआयएक्स 56 टक्के तेजीत आहे.

![]()















