• Latest
  • Trending
दीक्षितांच्या सहाव्या पिढीची परंपरा आजही कायम

दीक्षितांच्या सहाव्या पिढीची परंपरा आजही कायम

April 8, 2025
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

दीक्षितांच्या सहाव्या पिढीची परंपरा आजही कायम

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

नाशिकमध्ये आज श्री राम, गरुड रथ यात्रा

नाशिक : श्री रामनवमी नंतर दोन दिवसांनी म्हणजेच आज नाशिकमध्ये श्रीराम व गरुड रथ काढण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे 70 वर्षानंतर गरुड रथाचे मोठ्या प्रमाणात नूतनीकरण करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने रथाच्या वरच्या अग्रभागी असलेल्या पूर्वापार गरुड मूर्तीचेही नुतनीकरण करण्यात आले आहे. त्या जागी आता फायबर ग्लासमधील गरुडाची पूर्णाकृती मूर्ती दीक्षित परिवाराच्या वतीने नंदन दीक्षित यांनी यावर्षीचे सालकरी हेमंत बुवा, पुजारी संस्थांचे विश्वस्त धनंजय पुजारी आणि नरेश पुजारी यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली.

याप्रसंगी हेमंत बुवा पुजारी, नंदन दीक्षित, रवींद्र दीक्षित, पवन दीक्षित, विश्वस्त धनंजय पुजारी, नरेश पुजारी, महंत सुधीरदास पुजारी, ॲड. अविनाश भिडे आदी मान्यवर उपस्थित होते. तीन फूट चार इंच रुंद दोन फूट उंच अशी ही आकर्षक मूर्ती मुंबईचे प्रसिद्ध शिल्पकार गणेश शिरसागर यांनी घडवली आहे ही मूर्ती रथावर स्थानापन्न करण्यात आली असून ती रथाचे जणू  सारथ्य करणार असल्याचे नंदन दीक्षित म्हणतात.दीक्षित परिवाराच्या मार्गदर्शनाखाली श्री अहिल्याराम व्यायामशाळेचे पदाधिकारी आणि बलोपासक गरुड रथातील पादुकांचे दर्शन भाविकांना घडवून आणत असतात. ही जबाबदारी गरुड रथाचे वंश परंपरागत मानकरी बाळंभट दीक्षितांचे वारसदार असलेल्या दीक्षित परिवाराकडे असते.  मुख्य म्हणजे  दीक्षित परिवाराने सहाव्या पिढीची ही परंपरा कायम ठेवलेली आहे.असा आहे मिरवणूक मार्ग…. परंपरेनुसार आज मंगळवारी सायंकाळी पाच वाजता श्री काळाराम मंदिर पूर्व दरवाजा येथे यंदाचे उत्सव मानकरी हेमंत बुवा पुजारी यांच्या हस्ते दोन्ही रथांचे विधिवत पूजन केल्यानंतर बुवांनी आदेश देतात गरुड व रामरथ ओढण्यास प्रारंभ केला जाईल रामरथ आणि गरुड रथ ओढण्याची जबाबदारी असलेल्या समस्त पाथरवट समाज व सरदार रस्ते आखाडा तालीम संघ तसेच अहिल्याराम व्यायाम शाळेच्या पदाधिकारी व मानकरांना मानाचा गंध लावून उत्सव मानकरी हेमंत बुवा यांच्या हस्ते मानाचा नारळ दिला जाईल. श्री काळाराम मंदिर पूर्व दरवाजा येथून निघालेली रथयात्रा ढिकले नगर ,नाग चौक, चार हत्तीपूल, काट्यामारुती चौक, जुना आडगाव नाका येथून वळण घेत गणेशवाडी रस्त्याने पुढे गौरी पटांगणावर येईल रामरथ नदी ओलांडत नसल्याने रामरथ म्हसोबा महाराज पटांगणावर उभा केला जाईल. गरुड रथ रोकडोबा, बोरपट्टी, मेन रोड, सराफ बाजार, बालाजी मंदिर, कपूरथळा, परिसरातून मिरविण्यात येऊन म्हसोबा महाराज पटांगणावर आणला जाईल. पुढे दोन्ही रथ रामकुंड येथे नेले जातील.

Loading

Previous Post

 Black Monday ! शेअर बाजारात हाहाकार

Next Post

इंदिरानगर येथील सायकल ट्रॅक मध्ये “आग”

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White