• Latest
  • Trending
रक्षक झाले भक्षक !  पोलिसाचे तस्करांबरोबर संपर्क

रक्षक झाले भक्षक !  पोलिसाचे तस्करांबरोबर संपर्क

April 6, 2025
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

रक्षक झाले भक्षक !  पोलिसाचे तस्करांबरोबर संपर्क

YOU MAY ALSO LIKE

नाशिकमध्ये मित्राने मोबाईलचा रिमोट ॲक्सेस घेतला आणि विवाहितेने जीवन संपवलं

नाशिकचा ‘तो’ नेता तुरुंगातून लढविणार निवडणूक

पोलीस आयुक्तांकडून निलंबनाची कारवाई, केले गुन्ह्यात सहसंशयित

नाशिक : कुंपणच शेत खात’ तेव्हा, अशी म्हण आपण नेहमीच  ऐकत असतो.  मात्र  नाशिक पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्याने ही म्हण प्रत्यक्षात उतरून दाखविली आहे. या पोलीस हवालदाराचे एमडी ड्रग्ज पेडलर्स त्याचबरोबर गोवंश तस्करांबरोबर असलेल्या संबंधातून त्या पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन करण्यात आल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार  वडाळागावात 2023 मध्ये ‘छोटी भाभीचा’  एमडीचा अड्डा पोलिसांनी छापा टाकत उद्ध्वस्त केला होता. या कारवाईत पोलिसांनी एमडी तस्कर वसीम रफिक शेख, नसरीन उर्फ छोटी भाभी इम्तियाज शेख (रा .वडाळागाव) यांना अटक केली होती. त्यानंतर छोटी भाभीचा पती इम्तियाज शेख, भिवंडीतुन सलमान अहमद फलके, ठाण्यातून शब्बीर उर्फ आयना, अब्दुल अजीज मेमन,कसाऱ्यातुन सद्दाम सारंग यांना अटक करण्यात आली होती. तर गेल्यावर्षी चिपड्या शेख व करण सोनटक्के या दोघांना अटक करण्यात आली होती. या संशयितांच्या सातत्याने संपर्कात पंचवटी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी संशयित युवराज शांताराम पाटील(2726) होते. त्याचबरोबर भद्रकाली, नाशिकरोड या पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील गोवंश तस्कर यांच्याबरोबर वेळोवेळी फोनवरून युवराज पाटील यांचे संपर्क होते.तस्करांना मदत करण्याच्या उद्देशाने तब्बल पाचशे कॉल केल्याची माहिती समोर येत असून ही धक्कादायक बाब उघड झाल्यानंतर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार आयुक्तालयाने कठोर कारवाई करत युवराज पाटील यांचे निलंबन करत त्यांना संबधित गुन्ह्यात सहसंशयित केले आहे. निलंबन आदेशात काय… अमली पदार्थविरोधी कायद्यानुसार इंदिरानगर पोलीस ठाण्यात 2023 साली दाखल असलेल्या गुन्हा नोंद क्रमांक 268 मध्ये एनडीपीएस कलम 8(क),20(ब)22(क) 29 याप्रमाणे गुन्ह्यात संशयित युवराज पाटील यांचा सहभाग निष्पन्न झाल्याचेही निलंबन आदेशात म्हटले आहे त्या गुन्ह्यात आरोपींमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला आहे. आरोपींसोबत संपर्क ठेवून संभाषण करत गोपनीयतेचा भंग करणे, राज्य नागरिक सेवा (वर्तवणूक) नियमामधील नियम क्रमांक तीन नुसार सचोटी राखण्यास कसूर करणे, कर्तव्य पारायणता न ठेवणे, शासकीय कर्मचाऱ्याला अशोभनीय कृती करणे, कर्तव्यात बेजबाबदार बेशीस्त, निष्काळजीपणाचे वर्तन करत पोलीस दलाच्या शिस्तीला न अशोभनीय कृत्य केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.निलंबन काळात युवराज पाटील यांनी पोलीस मुख्यालयात राखीव पोलीस निरीक्षकांकडे दिवसातून दोनदा हजेरी लावणे बंधनकारक असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. निलंबन काळात त्यांची नेमणूक मुख्यालय येथे करण्यात आली आहे. नाशिक शहरात एमडीचा शिरकाव…. सन 2023 च्या ऑक्टोंबर महिन्यात ड्रग्स माफिया ललित पान पाटीलचा नाशिकच्या सामनगाव येथील एमडी कारखाना उध्वस्त झाल्यावर शहरातील वडाळागावातून छोटी भाभी त्यानंतर सनी पगारे अर्जुन पिवाल या दोन मोठ्या टोळ्यासह आत्तापर्यंत सहा ते सात टोळक्यांना एमडी तस्करीत अटक करण्यात आली आहे हे सर्व जण अमली पदार्थाच्या व्यवसायात पुढे आली आहेत. तर दोन महिन्यांपूर्वी नाशिकच्या तीन महिलांना ‘एनडीपीएस’ ने एमडी तस्करीत बेड्या ठोकल्यावर नशेसह हौस भागविण्यासाठी त्यांनी हा मार्ग निवडल्याचे समोर आले.

Loading

Previous Post

12 कोटींना गंडा घालणारा भामटा गजाआड

Next Post

 Black Monday ! शेअर बाजारात हाहाकार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White