राजस्थानच्या सिकर जिल्ह्यातून अटक !

नाशिक : 12 कोटी 61 लाख 68 हजार रुपये बनावट दस्ताऐवजाद्वारे परस्पर लांबविणाऱ्या भामट्याच्या मुसक्या नाशिकच्या गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाने राजस्थानमध्ये जाऊन आवळत त्याला गजाआड करण्यात यश मिळविले. मिळालेल्या माहितीनुसार पंकज कुमार आनंद कुमार ठाकूर यांच्या कंपनीने भागीदारीमध्ये संभाजीनगर, आडगाव, निफाड येथील रस्त्यांचे बांधकाम केले होते. बांधकामाच्या नुकसानभरपाईपोटी मिळालेल्या मोबदल्याच्या रकमेपैकी 12 कोटी 61 लाख 68 हजार रुपयांचे बनावट दस्तऐवज तयार करून ते बँकेत सादर करत संशयित शकुर अहमद जमालूद्दीन सय्यद (60 रा तिडके कॉलनी) याने व इतरांनी ही रक्कम त्यांच्या एका कंपनीच्या खात्यात वर्ग करून ठाकूर यांच्या कंपनीची आर्थिक फसवणूक केली होती. त्यांनतर 21 जानेवारी रोजी कंपनीची आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार सरकारवाडा पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास गुंडाविरोधी पथक व सरकारवाडा पोलीस करत असताना प्रमुख संशयित शकुर सय्यद हा मध्यप्रदेशच्या इंदूर मध्ये लपून बसल्याची माहिती मिळाली.
यादरम्यान पथकाने सापळा रचण्याआधीच शकुर सय्यद हा इंदूरमधून थेट राजस्थानमधील सिकर जिल्ह्यात पोहचला. अखेर पोलीस पथकाने राजस्थानला जात सिकर जिल्हा गाठला याठिकाणी मानवी व तांत्रिक कौशल्य वापरून शकुर सय्यदचा शोध घेत सापळा रचला या सापळ्यात शकुर अलगद अडकला पथकाने पुढील कारवाईसाठी त्यास नाशिकमध्ये आणून शहर आर्थिक गुन्हे शाखेच्या हवाली केले. ही महत्त्वाची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशावरून उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते,प्रदीप ठाकरे, मलंग गुंजाळ, विजय सूर्यवंशी, अक्षय गांगुर्डे, राजेश राठोड, भूषण सोनवणे, कल्पेश जाधव, गणेश भागवत, प्रवीण चव्हाण, अशोक आघाव, सुनीता कवडे आदींनी राजस्थान येथे जाऊन केली.

![]()















