• Latest
  • Trending

गुडीपाडवा मेळाव्यात “राज की बात” कळणार…लोकसभा लढणार की विधानसभा ?

April 9, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

गुडीपाडवा मेळाव्यात “राज की बात” कळणार…लोकसभा लढणार की विधानसभा ?

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

नक्की काय घडलंय… काय घडतंय…..

नाशिक : शहरात काही दिवसांपूर्वी मनसेचा 18 व्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले होते. आगामी काळात पेशन्स ठेवा. यश नक्की मिळणार. मी तुम्हाला यश मिळवून देणार हा माझा शब्द आहे असे राज ठाकरे म्हणाले होते मला माझ्या कडेवर माझी पोर खेळवायची आहेत. सध्या राज्यात दुसऱ्यांची पोरं खेळवतात. पण माझ्या खांद्यावर माझी पोर खेेेळण्याची ताकद आहे. त्यानंतर बऱ्याच राजकीय घडामोडी झाल्यात. या दरम्यान भाजपा मनसे युती होणार असल्याची देखील चर्चा रंगली होती  यावेळी एक मोठी बातमी समोर आली मनसे अध्यक्ष राज ठाकरे थेट मुंबई सोडून दिल्लीला पोहोचले आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली सोबत अमित ठाकरे देखील होते. या भेटीत राज ठाकरे आणि अमित शहा यांच्यात नेमकी काय चर्चा झाली विषय लोकसभा विधानसभा निवडणुकांचा होता का ? का याबाबत खुद्द राज ठाकरेंनी मौन पाळले. या भेटीनंतर बाळा नांदगावकर यांनी मीडिया बरोबर बोलताना सांगितले की मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित शहा यांची भेट झाली या भेटीत लोकसभा निवडणुकीबाबत अंतिम निर्णय होऊ शकतो असे नांदगावकर म्हणाले. यादरम्यान उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सोबत तर दुसऱ्या भेटीत मुंबईतील नामांकित हॉटेलमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, फडणवीस यांच्यात बराच वेळ चर्चा झाली मात्र त्याचा तपशील बाहेर आला नाही. यानंतर राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क मांडले जाऊ लागले. ते म्हणजे राज ठाकरे, अमित शहा भेटीदरम्यान ठाकरे यांनी दोन जागा दक्षिण मुंबई आणि मध्य मुंबई मनसेला मिळाव्यात पण दुसरी जागा देणे कठीण असल्याचे अमित शहा यांनी राज ठाकरेंना सांगितले. त्याचबरोबर राज ठाकरेंनी लोकसभेनंतर कसे पुढे जायचे याबद्दलही विचारणा केली तर या घडीला कुठली कमेंटमेंट देणे शक्य नाही असेही अमित शहा म्हणाले म्हणजेच विधानसभा देखील एकत्र लढू पण तेव्हा जागावाटप त्यावेळी ठरू अशी चर्चा झाल्याचे समजते. त्याचबरोबर शिंदे गटाच्या शिवसेनेचे नेतृत्व राज ठाकरे यांनी करावे असा प्रस्ताव देखील राज ठाकरे यांच्या समोर ठेवण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे या भेटीत नेमकं काय झालं  ?कुठल्या विषयांवर चर्चा झाली ? मनसे महायुतीत जाणार का स्वातंत्र्य लढणार ?लोकसभा निवडणुकीबाबत काय निर्णय घेणार, त्याचबरोबर शिंदे यांच्या शिवसेनेचे नेतृत्व राज ठाकरे यांनी करावे या चर्चेत कितपत तथ्य आहे. हे  स्वतः राज ठाकरे हेच सांगू शकतात. त्यामुळे गुढीपाडवा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मनसेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडरवरून गुढीपाडव्याच्या मेळाव्याचा टीजर लाँच केला आहे. यामध्ये राज ठाकरे यांच्या आवाजातील व्हिडिओ असून गेले काही आठवडे आपल्या पक्षाबद्दल चर्चा आणि तर्क वितर्क घडवले गेले आहेत. याकडे मी शांतपणे बघत होतो तुम्हालाही अनेकांनी प्रश्न विचारून भंडावून सोडले असेल पण आता या सगळ्यांवर बोलण्याची वेळ आली आहे नक्की काय घडते, घडवले जाते हे सांगण्याची वेळ आली आहे असे राज यांनी यात म्हटले आहे. मात्र सध्याच्या चित्रानुसार महायुतीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आल्याने मनसे सहभागाची शक्यता धूसर वाटू लागली आहे. त्यामुळे मनसे लोकसभा  लढणार की लोकसभा न लढता थेट विधानसभेत निवडणुकांना सामोरे जाणार हे येत्या काही तासातच गुढीपाडव्याच्या मेळाव्यात स्पष्ट होणार आहे.                      मनसेची ताकद किती ?  राज ठाकरे कोणता निर्णय घेतात याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत 36 पैकी किंवा 25 मतदारसंघात निवडणूक लढवत पाच लाखांच्या आसपास मते मिळाली होती. तेवढी मते येत्या लोकसभा निवडणुकीत मनसेला मिळणार का ? व मिळाली तर कोणाच्या विजयात मोजली जाणार हा चर्चेचा विषय आहे. मनसेचे उमेदवार 2019 मध्ये माहीम, माघठाणे, शिवडी, मुलुंड, भांडुप, घाटकोपर पूर्व आणि पश्चिम या सात ठिकाणी दुसऱ्या स्थानावर होते, तर पंधरा ठिकाणी तिसऱ्या स्थानावर होते यामुळे मनसेची मते निर्णायक ठरतील हे महत्त्वाचे….

Loading

Previous Post

महाराष्ट्रात मोदींची जादू तर शिंदेंची कोंडी, दादांची अडचण……..

Next Post

चिन्हावर कॉम्प्रमाईज नाहीच”मनसेच”ठरलं लोकसभा लढणार नाही मात्र भाजपा महायुतीला बिनशर्त पाठींबा,विधानसभेची तयारी …..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White