मी जे “मनसे” नावच अपत्य जन्माला घातलं त्याचाच मी अध्यक्ष राहणार-राज ठाकरे

नाशिक :ब्लॅक अँड वाइट न्यूजचा प्रश्न खरा ठरला मनसे लोकसभा लढवणार की विधानसभा ? आज शिवाजी पार्क परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यास महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मनसेच्या हजारो कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. यावेळी सुरुवातीलाच बोलताना राज ठाकरे म्हणाले म्हणाले की महानगरपालिकेच्या निवडणुका आज होणार,आज होणार मात्र अजूनही झाल्या नाहीत मात्र लोकसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. यादरम्यान निवडणूक आयोगाला राज ठाकरे यांनी खडे बोल सुनावले. डॉक्टर आणि नर्सेस यांना निवडणुकीच्या कामात का गुंतवले गेले. रुग्णालय सोडून डॉक्टर मतदारांची नाडी मोजणार आहेत की नर्सेस डायपर बदलणार आहेत. दर पाच वर्षांनी निवडणूक होते हे निवडणूक आयोगाला चांगले माहीत असताना, आधीच निवडणुकीसाठी फळी का उभारली जात नाही. ऐन वेळेस कधी शिक्षक, डॉक्टर, नर्सेस, यांना निवडणुकांचे काम दिले जाते रुग्णसेवा सोडून त्यांनी हे काम करायचे का असा सवाल राज ठाकरे यांनी केला त्याबरोबर कुणीही कामावर जाऊ नका तुम्हाला नोकरीवरून कोण काढतो तेच मी बघतो असा सज्जड इशाराही राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला दिला.यावेळी उलट-सुलट बातम्या लावणाऱ्या पत्रकारांचा समाचार घेताना राज म्हणाले मला शिवसेना प्रमुख व्हायचे असते तर कधीच झालो असतो.32 आमदार 5 खासदार बाहेर उभे होते मात्र पक्ष फोडणे व दुसऱ्याच्या हाताखाली काम करणे मला मान्य नव्हते.मी फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्याच हाताखाली काम केलं आहे. म्हणून मी माझे स्वताचे अपत्य जन्माला घातले ते म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना जे आज 18 वर्षाच झालं आहे . आणि त्या अपत्याचाच मी अध्यक्ष कायम असणार आहे. जागावाटपाची चर्चा झाली ते म्हणाले आमच्या चिन्हावर निवडणुका लढावा , मी एक सांगतो हे रेल्वे इंजिन हे चिन्ह आपल्या सर्वांच्या कष्टाने आले आहे. कोणासारखे आयते ,सहज आले नाही. चिन्हावर कॉम्प्रमाईज नाहीच, मी दिल्लीला गेलो यात नवीन काय, काही वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरे देखील इंदिरा गांधी,संजय गांधी यांना भेटायला दिल्लीला गेले होते. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावेत हे बोलणारा मी पहिला व्यक्ती, आणि काही गोष्टी पटल्या नाहीत ,त्या नाही पटल्या,म्हणून विरोध करणारा देखील मीच, मी टोकाचा विरोध करणारा व टोकाचे प्रेम करणार आहे. लाव रे व्हिडीओ देखील माझाच आणि 370 कलम रद्द केल्यानंतर अभिनंदन करणारा मी, मला मुख्यमंत्री पद भेटल नाही म्हणून मी विरोधात बोललो होतो का ? ,मला भूमिका पटली नाही म्हणून मी विरोध केला. आज हे विरोधात बोलताहेत मग मी ज्यावेळी विरोधात बोलत होतो. त्यावेळी खिशातले राजीनामे बाहेर काढून माझ्याबरोबर का नाही आलात. त्यावेळी सत्तेत मिळणारा मलिदा चाटत बसले होते. तुमचा पक्ष फुटला, तुम्हाला बाहेर काढले म्हणून विरोध करता आहात का, पण व्यक्तिगत टीका मी कधीही केली नाही.मी बाळासाहेब यांच्या बरोबर असताना भाजपा नेत्यांबरोबर माझे संबंध आलेत यामध्ये गोपीनाथ मुंडे नितीन गडकरी प्रमोद महाजन यांच्याबरोबरचे माझे संबंध हे राजकारणाच्या पलीकडचे होते काँग्रेस बरोबर माझे तसे कधी संबंध नव्हते. भेटी होत्या पु ल देशपांडे म्हणायचे त्याप्रमाणे गाठी पडल्या त्या भाजपावाल्यांबरोबर मी गुजरातला गेलो गुजरातला मध्ये चाललेलेे डेव्हलपमेंट बघितले पण ते महाराष्ट्रापेक्षा कमीच,आज या जगात सर्वात तरुण देश म्हणजे भारत आहे, या देशात तरुण मोठ्याप्रमाणात आहे, माझी मोदीनकडून अपेक्षा आहे. भारतातल्या तरुणांकडे लक्ष द्या, या देशातील अनेक उद्योजक देश सोडून गेले याकडेही लक्ष द्या, ही लोकसभा देशाचे भवितव्य ठरवणार आहे. आपण या महाराष्ट्राला योग्य मार्ग दाखवू मात्र मला महाराष्ट्राकडून अपेक्षा आहे कृपा करून व्यभिचाराला राजमान्यता देऊ नका.मला वाटाघाटी नको मला राज्यसभा ही नको विधानपरिषद नको पण या देशाला खांबिर नेतृत्व हवं ,मला काही अपेक्षा नाहीत. मी फक्त नरेंद्र मोदींसाठी महायुतीला पाठींबा देत आहे आणि महाराष्ट्र सैनिकांनी विधानसभेच्या तयारीला लागा असे आदेश कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांनी दिलेत

![]()











