तब्बल 20 दिवसांनी राहुल धोत्रे हत्याप्रकरणी अटक,राजकीय क्षेत्रात खळबळ

नाशिक : हत्या प्रकरणात गेल्या 20 दिवसांपासून फरार असलेले भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांना अखेर अटक करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नाशिकच्या नांदूर-नाका परिसरात 22 ऑगस्ट 2025 रोजी हिंसक हाणामारी झाली होती.अगदी किरकोळ कारणातून या हाणामारीला गंभीर वळण लागले होते.माजी नगरसेवक उद्धव निमसे यांच्या गटातील तरुणाच्या दुचाकीचे चाक राहुल धोत्रे यांच्या पायावरून गेल्याने वादाला तोंड फुटले यातून धोत्रे आणि निमसे गटात मोठ्याप्रमाणात तणाव वाढला आणि या दोन्ही गटात फ्रीस्टाईल हाणामारी झाली.या हाणामारीत निमसे गटाने धोत्रे गटातील राहुल धोत्रे आणि अजय कुसळकर यांच्यावर चॉपर, चाकू, हॉकीस्टिक यासारख्या धारदार शस्त्राने हल्ला चढवला. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले असता त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र 20 ऑगस्ट रोजी राहुल धोत्रे यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आडगाव पोलीस ठाण्यात निमसे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.त्यांच्या काही सहकाऱ्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले होते. मात्र उद्धव निमसे हे फरार झाले होते. त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी चार पथके तैनात केली होती.मात्र निमसे गुजरात, राजस्थान, आंध्रप्रदेश, दिल्ली आणि कर्नाटक राज्यात प्रवास करत होते. अटकपूर्व जामीनासाठी निमसे यांनी न्यायालयात अर्ज केला होता मात्र तो फेटाळण्यात आला होता.अखेर 20 दिवसांपासून फरार असलेल्या उद्धव निमसे यांनी आज 15 ऑगस्ट 2025 रोजी पोलिसांसमोर स्वतःहून हजर होत आत्मसमर्पण केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. ते सीसीटीव्ही फुटेज झाले होता व्हायरल…..घटनेच्या दिवशी झालेल्या हाणामारीचे सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल झाल्याने व या सीसीटीव्हीत उद्धव निमसे दिसत असल्याने राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती.त्यानंतर धोत्रे कुटूंबियांनी निमसे यांना तत्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी पोलीस आयुक्त ऑफिस समोर आंदोलन केले होते. या घटनेनंतर नाशिक शहरातील गुन्हेगारी ऐरणीवर आल्याचे चित्र समोर आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला होता. या प्रकरणात खा. संजय राऊत यांनी केले होते गृहमंत्र्यांना लक्ष……शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या संयुक्त मोर्चात खा. संजय राऊत यांनी धोत्रे या युवकाची हत्या सत्ताधारी मंत्र्यांच्या कार्यकर्त्यानी केल्याचा मोठा आरोप केला होता. आंदोलन करणारे आमचे कार्यकर्ते पोलिसांना मिळतात, मात्र भाजपचा माजी नगरसेवक मिळत नाही. भाजपचा नगरसेवक हत्या करून फरार होतो. फरार असताना तो मंत्री गिरीश महाजन यांना बंगल्यावर भेटतो. त्याला कोण वाचवतेय, संशयित निमसे कुठल्या सरकारी बंगल्यात लपलाय. असे प्रश्न करीत त्यांनी गृहमंत्र्यांनाही लक्ष्य केले होते.

![]()















