
नाशिक: शहरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली असून गुन्हेगार इतके निर्ढावले आहेत की दिवसाढवळ्या घरात घुसून महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी ओढण्याची हिंमत करत असल्याची घटना घडल्याने नाशकात महिलांच्या सुरक्षिततेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार पंचवटी परिसरातील रामवाडी भागात प्लॅट मध्ये राहत असलेल्या नंदिनी नायक (वय65) या महिला आपले काम आटोपून दुपारच्या सुमारास घरी परतत असतानाच राहत्या सोसायटीच्या खाली दोन युवक त्यांना भेटले. यादरम्यान पिण्यासाठी पाणी हवे आहे असे म्हणत ते युवक नायक यांच्यासोबत त्यांच्या दुसऱ्या मजल्यावरील प्लॅटवर आले.यादरम्यान त्यांनी पुन्हा एकदा काकू-काकू म्हणत पिण्याच्या पाण्याची मागणी केली. यादरम्यान दोघा संशयितांना बाहेरच उभे करत त्यांनी प्लॅटचा दरवाजा उघडत पाणी आणण्यासाठी घरात गेल्या याचवेळी संधी साधून दोघांपैकी एकाने घरात प्रवेश केला त्यावेळी नंदिनी नायर पाणी घेऊन येत असतानाच संशयिताने त्यांचे तोड दाबले आणि दुसऱ्याने त्यांच्या गळ्यातील पोत खेचली यावेळी नायर यांनी मोठ्या हिमतीने एका संशयितांचा टीशर्ट ओढून धरला आणि आरडाओरडा सुरू केला मात्र मदतीला कोणीच धावून आले नसल्याने दुसऱ्याने नायर यांना मारहाण करत 40 हजारांची पोत हिसकावत घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्याविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली या घटनेचा थरार सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. मात्र घटनेमुळे कुणा गरजु व्यक्तीला पिण्यासाठी पाणी दयावे की नाही याबाबत प्रशचिन्ह उपस्थित झाले असून महिलांनी देखील दारावर अनोळखी व्यक्ती आल्यावर पटकन दरवाजा उघडू नये त्याचबरोबर दारावर सेफ्टी डोअर बसवावा जेणेकरून संपूर्ण दरवाजा न उघडता त्या सेफ्टी डोअर मधून संवाद साधता येऊ शकेल. या घडलेल्या घटनेने महिला वर्गात भीतीचे वातावरण पसरले असून त्या चोरट्यांना लवकरात लवकर गजाआड करण्याची मागणी होऊ लागली आहे.

![]()












