पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

नाशिक : स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली असून पंतप्रधान मोदी यांनी दिवाळीत जीएसटीसंदर्भात मोठा निर्णय घेणार असल्याचे सांगितले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून याची घोषणा करताच अर्थ मंत्रालयातील अधिकारी कामाला लागले आहेत. नव्या रचनेनुसार, दैनंदिन वापरातील वस्तू आणि सेवांवर केवळ 5 आणि १८ टक्क्यांपर्यंतच कर आकारणी करण्यात येण्याची शक्यता आहे.या नवीन जीएसटी प्रणालीमुळे अनेक गोष्टी स्वस्त होणार आहे. रोजच्या वापरातील वस्तूंवरील जीएसटी कमी होणार आहे. परिणामी नागरिकांना कमी टॅक्स द्यावा लागणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात सांगितले की दिवाळीपर्यंत दैनंदिन वापराच्या वस्तूंवरील कर कमी करण्यासाठी नेक्स्ट-जनरेशन GST सुधारणा लागू केल्या जातील. यामुळे नागरिकांना भराव्या लागणाऱ्या टॅक्सच्या दरांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होईल, ज्यामुळे लघु उद्योग आणि एमएसएमईंना फायदा होईल, तर दैनंदिन वापरातील उत्पादने स्वस्त होतील, असे पंतप्रधानांनी मोदी म्हणाले.या दिवाळीत देशवासीयांना मोठं गिफ्ट मिळणार आहे… गेल्या आठ वर्षांत आम्ही GST मध्ये एक मोठी सुधारणा केली आहे… आम्ही नेक्स्ट जनरेशन GST रिफॉर्म्स करणार आहोत. यामुळे देशभरातील करांचा भार कमी होईल त्याचबरोबर अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार असल्याचेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
२०१७ मध्ये जीएसटी लागू झाला
सरकारने १ जुलै २०१७ रोजी देशभरात जीएसटी लागू केला. त्यानंतर, केंद्र आणि राज्य सरकारचे १७ कर आणि १३ उपकर काढून टाकण्यात आले. जीएसटीला ७ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल, अर्थ मंत्रालयाने गेल्या सात वर्षात केलेल्या कामगिरीबद्दल पोस्ट केले.
जीएसटी हा एक अप्रत्यक्ष कर आहे. व्हॅट, सेवा कर, खरेदी कर, उत्पादन शुल्क अशा विविध अप्रत्यक्ष करांची जागा घेण्यासाठी २०१७ मध्ये तो लागू करण्यात आला. जीएसटीमध्ये ५, १२, १८ आणि २८% असे चार स्लॅब आहेत.
जीएसटी चार भागात विभागलेला आहे
सीजीएसटी (केंद्रीय जीएसटी): केंद्र सरकारद्वारे वसूल केला जातो.
एसजीएसटी (राज्य जीएसटी): राज्य सरकारे गोळा करतात.
आयजीएसटी (एकात्मिक जीएसटी): केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये विभागलेला आंतरराज्यीय व्यवहार आणि आयातीवर लागू.
उपकर: विशिष्ट उद्देशासाठी निधी उभारण्यासाठी विशिष्ट वस्तूंवर (उदा., लक्झरी वस्तू, तंबाखू) आकारले जाणारे अतिरिक्त शुल्क.

![]()















