तापमान 41 अंशांवर, उष्णतेच्या लाटेचा इशारा

नाशिक : शहरात मंगळवारी (दि 8) उन्हाच्या अति तीव्र झळांनी अक्षरशः नाशिककर भाजून निघाले. तापमानाचा पारा काल थेट 41 अंशांपर्यंत गेल्याने दुपारच्या सुमारास रस्त्यांवर शुकशुकाट दिसत होता. मुख्य म्हणजे सुमारे 13 वर्षांनंतर पहिल्यांदाच एप्रिलमध्ये पहिल्याच आठवड्यात कमाल तापमानाने चाळीशी ओलांडली आहे तेरा वर्षांनंतर 8 एप्रिल रोजी कमाल तापमान थेट 41.0अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले या तारखेला 2012 सालानंतर कधीही 41 अंशांपर्यंत तापमान पोहचल्याची नोंद आतापर्यंत झालेली नव्हती. यामुळे यंदा उन्हाचा कडाका अधिक असण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे दुपारच्या सुमारास रस्त्यांवर शुकशुकाट दिसत आहे.बुधवारी (दि 9) देखील उष्णतेच्या लाटेचा ‘यलो अलर्ट’ दर्शविण्यात आला आहे. यामुळे महापालिका, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य, पोलीस अशा सर्वच शासकीय यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. नागरिकांनी घ्या खबरदारी.. दुपारी महत्वाचे काम असेल तरच बाहेर पडा,दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत उन्हात फिरणे टाळा, लहान मुलांची शाळेत जाताना काळजी घ्या टोपीचा वापर करा, घरातील दारे खिडक्या उघड्या ठेवा, पिण्याच्या पाण्याचा जास्तीत जास्त वापर करा, गच्चीवर पक्षांना पिण्यासाठी पाणी ठेवा.

![]()














