• Latest
  • Trending
माझं पत्नीवर खूप प्रेम,तिला मी मुक्त करत आहे….

माझं पत्नीवर खूप प्रेम,तिला मी मुक्त करत आहे….

April 10, 2025
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

माझं पत्नीवर खूप प्रेम,तिला मी मुक्त करत आहे….

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

धक्कादायक….वृद्ध पत्नीचा पतीने आवळला गळा,स्वतःही घेतला गळफास

नाशिकरोड : परिसरात धक्कादायक घटना घडली असून  सेवानिवृत्त प्राध्यापकाने त्यांच्या पत्नीचा गळा दाबून खून करत नंतर स्वतःही गळफास घेत जीवन संपविले असून मृत्यूपूर्व लिहलेल्या चिठ्ठीत ते म्हणतात मी माझ्या पत्नीवर खूप प्रेम करतो, तिला आजारपणातून मुक्त करत आहे व तिच्यासोबत मी पण मुक्त होत आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सेवानिवृत्त प्राध्यापक मुरलीधर रामचंद्र जोशी (80) व त्यांच्या पत्नी सेवानिवृत्त शिक्षिका लता जोशी हे एकदंत अपार्टमेंटमध्ये पहिल्या मजल्यावर राहतात. त्यांचा मुलगा संदीप हा पनवेल येथे प्राचार्य असून दुसरा मुलगा प्रसन्ना मुंबईला असून त्याचा लघुउद्योग आहे. तर लता जोशी आजारपणामुळे अंथरुणावर खिळून होत्या. गेल्या साडेतीन ते चार वर्षांपासून त्या आजारपणाबरोबर लढा देत होत्या. त्यामुळे त्यांची सेवा करण्यासाठी एका संस्थेमार्फत सीमा नावाच्या महिलेला केअर टेकर म्हणून कामावर ठेवले होते.दुपारी सीमा या काम आटोपून निघून गेल्यावर  बुधवारी (दि9) रात्रीच्या सुमारास मुरलीधर जोशी यांनी मी माझ्या पत्नीवर खूप प्रेम करतो. तिला आजारपणातून मुक्त करत आहे….. अशी चिठ्ठी लिहून पत्नीचा गळा आवळला व स्वतःही गळफास घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. रात्री पुन्हा सीमा या घरी कामासाठी आल्या, त्यांनी त्यांच्या जवळील किल्लीने दरवाजा उघडला असता वृद्ध दांपत्य मृतावस्थेत अवस्थेत आढळले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृत्यूपूर्व चिठ्ठीत………. आत्महत्यापूर्वी जोशी यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत माझे पत्नी लता वर खूप प्रेम आहे ती अंथरुणाला खिळून असून आजाराला वैतागून गेली आहे. तिला या आजारापासून मुक्त करण्यासाठी व तिच्यासोबत मी पण मुक्त होत आहे. घरकाम करणाऱ्या सीमा हिने पत्नी लता हिची खूप सेवा केली. तिच्यासाठी 50 हजार रुपये बाजूला काढून ठेवले असून ते तिला देण्यात यावे. आमच्या दोघांच्या अंत्यसंस्काराचे पैसे देखील ठेवले असून अंत्यसंस्कारासाठी कोणीही खर्च करू नये. तसेच पत्नी लता हिच्यावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी नवीन साडी मंगळसूत्र जोडवे असे सर्व घालून अंत्यसंस्कार करावे असा मजकूर चिठ्ठीत लिहिलेला असल्याचे पोलिसांनी सांगितले

Loading

Previous Post

नाशकात उन्हाने 2012 सालचा रेकॉर्ड मोडला

Next Post

अपहरण करून खंडणी मागणारे गजाआड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White