अनेक भाविक जखमी झाल्याची माहिती

देशभरामध्ये आज हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. त्यानिमित्त सालाबादप्रमाणे यंदाही त्रंबकेश्वर रस्त्यावर असलेल्या अंजनेरी पर्वतावरही हनुमानरायाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. मात्र अचानक भाविकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली.
यात काही जण जखमी झाल्याचे माहिती मिळत आहे. अंजनेरी पर्वतावर असलेल्या मंदिरात दरवर्षी राज्यभरातून आलेले भाविक दर्शनासाठी जात असतात. अशातच या भाविकांवर अचानक मधमाशांनी हल्ला चढवला आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे काही काळ भाविकांची एकच धावपळ झाल्याचे झाली होती. मधमाशांनी अचानक हल्ला केल्यामुळे भाविकांमध्ये गोंधळ उडाला. स्वत:ला मधमाशांपासून वाचवण्यासाठी अनेकजण डोंगरावर आसरा घेण्यासाठी पळाले तर काहीजणांनी मंदिरात आसरा घेतला. परिसरातील ग्रामस्थांनी जखमी झालेल्या भाविकांना रुग्णालयात दाखल केले. दरवर्षी प्रमाणे नाशिकच्या हनुमानाच्या जन्मस्थळ असलेल्या अंजनेरी पर्वतावर यावर्षी देखील मोठी गर्दी जमल्याचे बघायला मिळाले आहे.

![]()















