• Latest
  • Trending
नाशकात वाद कबुतरांचा आणि खून तरुणाचा

नाशकात वाद कबुतरांचा आणि खून तरुणाचा

April 15, 2025
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशकात वाद कबुतरांचा आणि खून तरुणाचा

YOU MAY ALSO LIKE

नाशिकमध्ये मित्राने मोबाईलचा रिमोट ॲक्सेस घेतला आणि विवाहितेने जीवन संपवलं

नाशिकचा ‘तो’ नेता तुरुंगातून लढविणार निवडणूक

अवघ्या काही तासात गुन्हे शाखा युनिट 1 पथकाने संशयितांना ठोकल्या बेड्या

नाशिक :  शहरात अगदी किरकोळ कारणांवरून खुनाचे प्रकार नित्याचेच झाले असून असाच प्रकार पांडवलेणीजवळ घडला असून मित्राच्या कबुतरांच्या पेटीतून दोन कबुतर चोरून दुसऱ्याच्या पेटीत टाकल्याच्या कारणाने भांडण काढत एका तरुणाची धारदार शस्त्राने हल्ला चढवत हत्या करण्यात आली. तर दुसरा तरुण गंभीर जखमी आहे. मुख्य म्हणजे या हत्याकांडात अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार रविवारी रात्रीच्या सुमारास  रामदास उर्फ रामा नारायण बोराडे (20 रा डेमसे मळा) व राजेश बोराडे हे दोघे पांडवलेणीच्या पायथ्याजवळ बसलेले होते. यादरम्यान त्यांच्याच ओळखीचे संशयित शौकत फरीद शेख (19 रा फाळके स्मारक जवळची चाळ) नौशाद सय्यद (19 रा. सिन्नर) नफिस उर्फ नफ्या रफिक सय्यद (22 रा. ज्ञानेश्वर नगर) कार्तिक रंगनाथ भडांगे (19,सिहस्थ नगर सिडको) विजय सुनील माळेकर(19 रा पाथर्डी फाटा) रोहित चंद्रकांत पालवे (18 रा पांडवलेणी) नितीन विठ्ठल घुगे (19 रा पाथर्डीफाटा) व त्यांचे काही अल्पवयीन मित्र त्याठिकाणी आले. यावेळी मद्यप्राशन करत एकमेकांशी कुरापत काढत शिवीगाळ करून वाद घालण्यास सुरवात केली. यादरम्यान शौकत,रोहित यांनी त्यांच्या कंबरेला असलेले धारदार सुरे उपसत रामा व राजेश बोराडे यांच्यावर वार करण्यास सुरुवात केली.यावेळी मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने रामा बोराडे याचा मृत्यू झाला तर राजेश बोराडे गंभीर जखमी झाला. याचवेळी  यातील संशयितांनी परिसरात असलेल्या सोसायटीत घुसत तलवारीने वाहनांच्या काचा फोडत मोठ्याप्रमाणात दहशत माजविली. इंदिरानगर पोलीस ठाण्यात साहिल सिंग (20 रा अंबड) यांच्या फिर्यादीवरून आठ जनांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपायुक्त प्रशांत बच्छाव, संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली  गुन्हे शाखा युनिट -1 च्या पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड ,विशाल काठे, विशाल देवरे यांनी अवघ्या काही तासात चौघ्या हल्लेखोरांना बेड्या ठोकत गजाआड केले. कारण कबुतराचे…… हल्लेखोर संशयित आरोपींपैकी रामा बोराडेचा मित्र नेत्रदीपक याच्या कबुतरांच्या पेटीतून हल्लेखोरांच्या टोळीतील विजय माळेकर यांनी दोन कबुतर काही दिवसांपूर्वी काढून स्वतःच्या पेटीत नेऊन ठेवले होते. या कारणासह दारू पिण्यावरून वाद झाले. या वादातून रामाला हल्लेखोराने ठार मारल्याचे पोलिसांनी सांगितले.

Loading

Previous Post

अंजनेरी येथे भाविकांवर मधमाशांचा हल्ला

Next Post

नाशिकमध्ये मध्यरात्री पोलिसांवर दगडफेक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White