• Latest
  • Trending
नाशिकमध्ये मध्यरात्री पोलिसांवर दगडफेक

नाशिकमध्ये मध्यरात्री पोलिसांवर दगडफेक

April 16, 2025
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशिकमध्ये मध्यरात्री पोलिसांवर दगडफेक

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

काठे गल्ली रस्त्यावरून तीन दिवस वाहनांना प्रवेश बंद

नाशिक : नाशिकच्या काठे गल्लीत अनधिकृत दर्गा बांधकाम तोडकामाच्याआधी अचानक चालून आलेल्या जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. त्यानंतर पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.मिळालेल्या माहितीनुसार शहर पोलीस आयुक्तालय व वाहतूक शाखेच्या वतीने कायदा व सुव्यवस्थेच्या कारणासाठी काठे गल्ली सिग्नल ते वडाळारोड वरील नागजी सिग्नल पर्यंत बुधवारी रात्री पासून शुक्रवारी रात्रीपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद करण्यात येत असतानाच रात्री साडेबारा वाजेच्या दरम्यान अचानक जमलेल्या  मोठया  जमावाने चालून येत पोलिसांवर दगडफेक सुरू केली.या घटनेत 31 पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. यादरम्यान पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जमावाने काही गाड्यांची तोडफोड देखील केल्याचे समजते. दरम्यान घटनेची माहिती मिळताच राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी तातडीने घटनास्थळी दाखल करण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता द्वारकाकडे येणारे अनेक रस्ते बंद करण्यात आले. काही वेळातच पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. या दगडफेकीतील 15 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतप्त जमावाची समजूत काढण्यासाठी या दर्ग्याचे ट्रस्टी आणि प्रतिष्ठित नागरिकांना बोलावण्यात आले होते, परंतु त्यांनाही जमावाने जुमानले नाही. त्या रस्त्यावरून तीन दिवस वाहनांना प्रवेश बंद…….  काठे गल्ली सिग्नल कडून भाभानगर कडे जाणाऱ्या रस्त्यावर वडाळा रोडवरील नागजी सिग्नल पासून पुढे दुतर्फा वाहनांना ये जा करण्यास बंदी घालण्यात आली आहे. या मार्गावरून बुधवारी रात्रीपासून वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार असल्याचे अधिसूचनेत म्हटले आहे. वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे. मुंबईनाक्याकडून भाभानगर व काठेगल्ली पखालरोड कडे जाणाऱ्या वाहन चालकांनी वडाळामार्गे द्वारका वडाळारोड मार्गे भारतनगर अशोका मार्गावरून पुढे इतरत्र जाईल. तसेच काठेगल्ली कडून येणारी वाहने पुणे महामार्गावरून सरळ द्वारका चौकाकडे व तेथून डावीकडे वळण घेत मुंबई नाकाच्या दिशेने रवाना होतील सर्व नागरिकांनी या अधिसूचनेचे पालन करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. याबाबतची अधिसूचना पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी मंगळवारी काढली आहे

Loading

Previous Post

नाशकात वाद कबुतरांचा आणि खून तरुणाचा

Next Post

जखमी पोलिसांची आ. फरांदे यांनी घेतली भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White