• Latest
  • Trending
साहेब,आले अन् गेले….

साहेब,आले अन् गेले….

May 27, 2025
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

साहेब,आले अन् गेले….

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

दोन दिवसांचा दौरा तीन तासात घेतला आटोपता

नाशिक : आगामी महापालिका निवडणुका तोंडावर आल्याने सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. त्यानिमित्ताने मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा दौरा होणार होता. सुरवातीला गेल्या 15 व 16 ला राज ठाकरे येणार होते मात्र हा दौरा रद्द झाल्यानंतर 19 आणि 20 मेची तारीख ठरली मात्र हा दौरा देखील रद्द झाला .अखेर 26 तारखेचा मुहूर्त ठरला. आणि महिनाभरापासून वाट पाहणाऱ्या कार्यकर्त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला मुख्य म्हणजे हा दौरा दोन दिवसांचा होता.त्यामुळे कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली असताना मात्र तीन तासातच नाशिक दौरा उरकून राज ठाकरे मुंबईकडे रवाना झाले. यामुळे स्थानिक नेत्यांबरोबरच कार्यकर्ते देखील संभ्रमात पडले. राज ठाकरे यांच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे राज ठाकरे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कानमंत्र देतील व पुढील तयारीची दिशा ठरवली जाईल अशी अपेक्षा कार्यकर्त्यांची होती. राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी शहरात अनेक ठिकाणी झेंडे, बॅनर लावण्यात आले होते.मनसे सरचिटणीस दिनकर पाटील, डॉ प्रदीप पवार, सलीम शेख शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, धीरज भोसले यांनी त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी केली होती. राज ठाकरे यांचे सकाळी अकरा वाजता शहरात आगमन झाले दुपारी त्यांचे चांडक यांच्या निवासस्थानी भोजन झाले. यादरम्यान पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा केली मात्र या दरम्यान मुंबईहुन कोणाचा फोन आला आणि राज ठाकरे यांनी मुंबईकडे प्रस्थान केले. त्यामुळे तब्बल महिनाभरापासून त्यांची वाट पाहणाऱ्या कार्यकर्त्यांना ना भेट मिळाली ना चर्चा करण्याची संधी त्याचबरोबर शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्या युतीबाबत चर्चेची शक्यता व्यक्त करण्यात येत होती मात्र त्यावर देखील राज ठाकरे काहीही बोलले नाहीत. अखेर फक्त सेल्फी, फोटो काढण्यातच कार्यकर्त्यांनी धन्यता मानली. मात्र यामुळे राजकीय वर्तुळात या घटनेची जोरदार चर्चा झाली.

Loading

Previous Post

सिन्नरमध्ये बस टर्मिनलचे शेड कोसळले

Next Post

बहिणीला प्रपोज केल्याचा संशय आणि तरुणाचा खून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White