अवघ्या काही तासात गंगापूर पोलिसांनी केले संशयित गजाआड

नाशिक : शहरात खुनाच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असून अगदी किरकोळ कारणातून हल्ला,मारहाण आणि खुनाच्या घटना घडताना दिसत आहे. काल रात्री सातपूर परिसरातील शिवाजीनगरच्या पाझरतलावाजवळ तरुणाचा हल्लेखोरांनी खून केल्याची घटना घडली होती. यातील संशयितांना पोलिसांनी गजाआड केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार नसीम अकबर शहा (19 रा शिवाजीनगर सातपूर) यास संशयित विशाल तिवारी, आदित्य वाघमारे, वैभव भुसारे यांनी त्यास लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली व घटनास्थळावरून पळ काढला. मात्र काही नागरिकांनी या घटनेची माहिती गंगापूर पोलिसांना कळवली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत नसीम याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र त्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मूर्त घोषित केले. यादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासत सीसीटीव्ही फुटेजवरून हल्लेखोरांचा शोध सुरू केला. गंगापूर पोलिसांनी अवघ्या पाच तासात तिघा संशयिताना गजाआड करण्यात यश मिळविले. या तिघांनी कसून चौकशी केली असता संशयित विशाल तिवारीच्या बहिणीला नसीम शहा याने प्रपोज केल्याचा संशय होता. यामुळे त्याने त्याच्या मित्रांना सोबत घेत त्याला जाब विचारण्यासाठी अडवून मारहाण केली या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

![]()














