अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खाते सोपवले जाण्याची शक्यता

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ पुन्हा एकदा मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. मंगळवार, २० मे रोजी सकाळी १० वाजता राजभवनात हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत भुजबळ यांना मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे.
सध्या माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे असलेले अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खाते छगन भुजबळ यांच्याकडे सोपवले जाणार आहे. या घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा नव्या चर्चांना उधाण आले आहे. सकाळी दहा वाजता राजभवनात राज्यपाल भुजबळांना पद आणि गोपनीयतेची शपथ देणार आहेत. ५० लोकांच्या उपस्थितीतच हा कार्यक्रम पार पडणार आहे. त्यासाठी सोमवारी रात्रीपासूनच तयारी सुरू करण्यात आली आहे.

![]()















