केंद्र सरकारच्या माध्यमांना सक्त सूचना दिल्याने संबंधित कारवाईचे गांभीर्य वाढले

वृत्तसंस्था : भारताच्या लष्करी हालचाली आणि कारवायांचे शत्रूला फायदेशीर ठरणारे बेबंद प्रक्षेपण नको, अशा स्पष्ट सूचना माहिती प्रसारण मंत्रालयाने जाहीर केल्या असून पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत पाकिस्तान विरोधात कठोर कारवाई करण्याच्या बेतात असताना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने विविध माध्यमांना सक्त सूचना दिल्याने संबंधित कारवाईचे गांभीर्य वाढले आहे. भारताच्या लष्करी हालचाली आणि कारवायांचे लाईव्ह प्रक्षेपण करण्याच्या नादात अनेकदा शत्रूला फायदा होतो. शत्रूच्या लाईव्ह प्रक्षेपणातून नेमके धागेद्वारे उचलून प्रतिबंधात्मक कारवाई करू शकतो. हे लक्षात घेऊन भारताच्या लष्करी हालचाली आणि कारवाई यांचे लाईव्ह प्रक्षेपण टाळावे, असे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने संबंधित सूचनेत नमूद केले आहे.राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी, सर्व मीडिया प्लॅटफॉर्म, वृत्तसंस्था आणि सोशल मीडिया युजर्सना संरक्षण आणि इतर सुरक्षा-संबंधित कामकाजाशी संबंधित बाबींवर थेट वृत्तांकन करताना अत्यंत जबाबदारीने वागण्याचा आणि कायदे आणि नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. यापूर्वी कंदहार विमान अपहरण, कारगिल युद्ध आणि मुंबई वरचा 26/ 11 चा हल्ला या सगळ्या घटनांचे लाईव्ह प्रक्षेपण करण्याच्या नादात भारतीय माध्यमांनी भारतीय सुरक्षा दलांचे मोठे नुकसान केले होते. शत्रूला त्या लाईव्ह प्रक्षेपणाचा फायदा झाला होता. लाईव्ह प्रक्षेपणातलेच फुटेज पाहून शत्रूने प्रतिबंधात्मक हालचाली केल्या होत्या, याकडे माहिती प्रसारण मंत्रालयाने माध्यमांचे लक्ष वेधले आहे.


![]()















