• Latest
  • Trending

संयम ठेवा, मी तुम्हाला यश मिळवून देईन

March 12, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

संयम ठेवा, मी तुम्हाला यश मिळवून देईन

Sponsored by

YOU MAY ALSO LIKE

प्रभाग क्रमांक 23 भाजपच्या बालेकिल्ल्यात आता ठाकरे गटाची लढाई

नाशकात अनेक ठिकाणी दोन मित्रांमध्येच कुस्ती

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे राज्यस्तरिय मेळाव्यात पदाधिकायांना विश्‍वास

नाशिक, ता. ९ : मागील अठरा वर्षात अनेक चढ-उतार आले. यात चढ कमी आणि उतार जास्त राहिले. पण तुम्ही माझ्या सोबत राहीलातं हे मी माझे भाग्य समजतो. संयम ठेवा मी यश मिळवून देईन, हा माझा शब्द आहे. असा विश्‍वास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या पदाधिकायांना देताना सध्या राज्यात दुसऱ्यांची पोरं खांद्यावर खेळवण्याची पद्धत सुरु आहे. परंतू मी माझीचं पोरं कडेवर खेळविणार असून तेवढी ताकद माझ्यात असल्याचे सांगतं सध्याच्या राजकीय परिस्थितीवर टिका केली.
नाशिकच्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात पक्षाचा अठराव्या वर्धापन दिनानिमित्त ते बोलतं होते. पदाधिकायांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, आज-काल प्रत्येकाला वडा टाकला की तळून आला पाहिजे असे वाटते. परंतू तसे नसते त्यापुर्वी अनेक प्रकारच्या क्रिया पार पाडाव्या लागतात. राजकारणातही तेचं आहे. एकाएकी काही मिळतं नाही. राजकारणात वावरण्यासाठी संयम ठेवला पाहिजे. सयंम नसेल तर मग गाेट्यांसारखे यश काेठेतरी घरंगळत जाणार. आज भाजपचे यश दिसते. त्यात पंतप्रधान मोदींचे २० टक्के यश असेल. त्यापुर्वी पक्षासाठी ज्यांनी खस्ता खाल्या त्यांच्या मेहनतीचे फळ आहे. पक्षाची स्थापना १९५२ ची आहे. त्यातून वाजपेयी यांचे सरकार प्रथम १३ दिवस नंतर १३ महिने त्यानंतर साडेचार वर्ष आले. आता मोदींचे सरकार आले. सोशल मिडीयावर पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी वावरताना लोकांना जे हवयं तेचं दाखविले पाहिजे. उगाचचं गाडी येते मी उतरतो आणि रारारा गाणं लावले जाते याला अर्थ नाही

दोन्ही राष्ट्रवादी आतून एकचं
राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टिका करताना श्री. ठाकरे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नसून निवडून येणाऱ्यांची मोळी आहे. शरद पवार यांनी आत्तापर्यंत हेचं केले. आता वेगळे झाले तरी तेचं निवडून येणार आहेत. राष्ट्रवादीचे दोन गट दिसत असले तरी दोघेही आतून एकच आहेत. राज्यात जनसंघ, शिवसेना व मनसे हेचं एकमेव तीन पक्ष असे आहेत कि स्वबळावर स्थापन झाले. मराठा समाजाला आरक्षण देणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही. फक्त आश्‍वासन दिले जात आहे. जी गोष्ट होऊ शकत नाही त्याचे आश्वासन देत आहेत. मनोज जरांगे-पाटील यांना हे सांगितले होते. प्रगत महाराष्ट्रात लोकांना शिक्षण व रोजगार नाही. जाती-जातीत विष कालवले जात आहे. महाराष्ट्र एकसंघ नाही. एकत्र आल्यानंतर विष कालवले जाते. सध्याच्या राजकारणातून हाती काही लागणार नाही. मनसेत एकमेकांकडे जातीपातीने बघणारे चालणार नाहीत. येणाऱ्या निवडणुकीचे काय निर्णय घायचे त्याबाबत लवकरचं भुमिका स्पष्ट करणार असल्याचे राज ठाकरे म्हणाले.

सत्ता द्या भोंगे उतरवितो
मनसेने अठरा वर्षात अनेक आंदोलने केली. लाठ्या काठ्या खाल्ल्या, केसेस अंगावर घेतल्या. एकही आंदोलन अर्धवट सोडलं नाही. आंदोलनाची सुरुवात केली तसा शेवटही केला. अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक अजून का नाही झाले? मोदींनी वाहिलेल्या फुलांचे काय झाले? हे राज्यकर्त्यांनी कोणी विचारतं नाही. प्रार्थना स्थळांवरील भोंगे उतरविण्यासाठी आंदोलन केल्यानंतर उध्दव ठाकरे सरकारच्या काळात मनसैनिकांवर १७ हजार केसेस केल्या. हे हिंदुत्ववादी सरकार कसे? असा सवाल करताना ठाकरेयांनी सत्ता आल्यानंतर सगळे भोंगे बंद करण्याचे आश्‍वासन दिले. भोंग्यांचा मुस्लिम समाजातील लोकांनाही त्रास होतो. माहिम यथे समुद्रात दर्गा बांधला, एका रात्रीत काढला. अठरा वर्षात जेवढी आंदोलनं केली तेवढी आंदोलने इतर कोणत्याही पक्षाने केली नसल्याचा दावा ठाकरे यांनी केला.

Loading

Previous Post

“एसआयटी” चौकशी नाशिक पोलीस आयुक्त कर्णिक यांच्याकडे….

Next Post

हेडिंग देणे मुख्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White