
नाशिक : निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरात महायुतीतच अंतर्गत संघर्ष तीव्र होताना दिसत आहे शिंदे गटाची शिवसेना आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी यांचे उमेदवार थेट नऊ प्रभागात एकमेकांविरोधात मैदानात उभे ठाकले आहेत त्यामुळे विरोधकांपेक्षा मित्र पक्षातील स्पर्धेचीच अधिक चर्चा सुरू आहे काही ठिकाणी मात्र महायुतीतील घटक पक्षांनी समन्वयाची भूमिका घेत मैत्रीपूर्ण लढतीचे चित्र उभ केले आहे प्रचारात थेट हल्ले टाळून आपापली ताकद दाखवण्यावर भर दिला जात असल्याचे दिसते मात्र उमेदवारी स्थानिक वर्चस्व आणि कार्यकर्त्यांच्या अपेक्षा यामुळे अनेक ठिकाणी तणाव निर्माण झाल्याचे चिन्ह आहे या अंतर्गत स्पर्धेमुळे मत विभाजन होण्याची दाट शक्यता असून त्याचा थेट परिणाम निकालांवर होण्याची शक्यता आहे नाशिकमध्ये महायुतीचे रणनीती यशस्वी ठरणार की अंतर्गत लढाई अडचण ठरणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे अशा लढती रंगतील (1) प्रभाग क्रमांक 13 क शेखर देवरे (अजित पवार राष्ट्रवादी) विरुद्ध दीपक डोके (शिंदे गटाची शिवसेना) (2) प्रभाग क्रमांक 14 क शबाना पठाण (अजित पवार राष्ट्रवादी) विरुद्ध रूपाली डहाणके (शिंदे गटाची शिवसेना) (3) प्रभाग क्रमांक 18 आशा पवार (शिंदे गटाची शिवसेना) विरुद्ध शिवा गाडे (अजित पवार राष्ट्रवादी) (4) प्रभाग क्रमांक 18 ब रंजना बोराडे (शिंदे गटाची शिवसेना) शितल ताकाटे (शिंदे गटाची शिवसेना पुरस्कृत) विरुद्ध वंदना बोराडे (अजित पवार राष्ट्रवादी) (5) प्रभाग क्रमांक 18 क सुनिता भोजने (शिंदे गटाची शिवसेना) विरुद्ध रत्ना सातभाई (अजित पवार राष्ट्रवादी) (6) 18 ड सुनील बोराडे (शिंदे गटाची शिवसेना) विरुद्ध योगेश मिसाळ (अजित पवार राष्ट्रवादी) (7) प्रभाग क्रमांक 19 अ विशाखा भडांगे (शिंदे गटाची शिवसेना) विरुद्ध शीतल साळवे (अजित पवार राष्ट्रवादी) (8) 19 ब पंडित आवारे (शिंदे गटाची शिवसेना) विरुद्ध सचिन आहेर (अजित पवार राष्ट्रवादी) (9) 19 क जयश्री खर्जुल (शिंदे गटाची शिवसेना) विरुद्ध शोभा आवारे (अजित पवार राष्ट्रवादी)

![]()















