
नाशिक : प्रभाग 23 मध्ये भाजपचे अधिकृत उमेदवार रूपाली यशवंत निकुळे संध्या अभिजीत कुलकर्णी मंगला ननावरे चंद्रकांत कारभारी खोडे यांच्या प्रचाराला मोठ्या प्रमाणात वेग आला असून कल्पतरू नगर अशोका मार्ग खोडे नगर रविशंकर मार्ग आदी परिसरात बाईक रॅली काढण्यात आली त्यानंतर कृष्णा लॉन्स येथे मंत्री गिरीश महाजन यांची सभा घेण्यात आली यावेळी बोलताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे जर नाशिकचा विकास पाहिजे असेल तर नाशिक मध्ये भाजप पाहिजे म्हणून भाजपच्या उमेदवारांना निवडून द्या आपल्या उमेदवारासमोर जो कोणी उमेदवार आहे तो लोकांना धमकावत गुंडागर्दी करत आहे आम्ही या अशा लोकांची भिंत काढणार आहोत नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असल्याचे त्यांनी लक्षात ठेवावे त्याचप्रमाणे यावेळी बोलताना आमदार देवयानी फरांदे म्हणाल्या लाडकी बहीण तिच्या आयुष्याची काळजी घेत इतरांची काळजी घेत आहे यावेळी या सभेत परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती त्याचप्रमाणे बाईक रॅलीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत ठिकठिकाणी भाजप उमेदवार रूपाली निकुळे संध्या कुलकर्णी मंगला ननावरे चंद्रकांत खोडे यांना ओवाळत त्यांचे स्वागत केले याप्रसंगी मंत्री गिरीश महाजन,आमदार देवयानी फरांदे विजय चौधरी रवी अनासपुरे माजी महापौर सतीश कुलकर्णी अविनाश आंधळे सुनील खोडे श्याम पाटील प्रकाश ननावरे अर्जुन काळे यशवंत निकुळे त्यासह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

![]()















