RBI ने पाच वर्षांनंतर व्याजदरात केली कपात

नाशिक : आज मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा देत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जवळपास ५ वर्षांनंतर रेपो दरात कपात केली आहे. या निर्णयामुळे बँकांना गृह, वाहन, कॉर्पोरेट, शैक्षणिक आणि वैयक्तिक कर्जांवरील व्याजदरात कपात करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 12 लाख रुपयांपर्यंत आयकर न लावण्याच्या गोड बातमीनंतर आता सर्वसामान्यांना पुन्हा एक आनंदाची बातमी मिळाली आहे. RBI ने तब्बल पाच वर्षानंतर रेपो दरात कपातीचा निर्णय घेतला आहे. आरबीआयने व्याजदर ०.२५ टक्क्यांनी (२५ आधार अंकांनी) कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, आता लोकांना कर्ज मिळणे स्वस्त होणार आहे. याशिवाय, त्यांचा EMI चा बोजाही हलका होईल. या निर्णयामुळे बँकांना गृहकर्ज, वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज, कॉर्पोरेट कर्ज आणि वैयक्तिक कर्जावरील व्याजदरात कपात करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.आरबीआयने केलेल्या कपातीमुळे रेपो रेट ६.५० टक्क्यांवरून ६.२५ टक्क्यांवर आला आहे. आरबीआयचे नवीन गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पतधोरणविषयक समितीच्या (एमपीसी) बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शुक्रवारी सकाळी सहा सदस्यीय पॅनेलचा निर्णय जाहीर करण्यात आला. मल्होत्रा यांनी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतरची ही पहिलीच पतधोरण समितीची बैठक होती. एमपीसीची तीन दिवसीय बैठक बुधवारपासून सुरू झाली होती. जवळपास पाच वर्षांच्या अंतरानंतर व्याजदरात २५ आधार अंकांची कपात झाली आहे.आरबीआय आणि पतधोरण समितीवर त्यासाठी मोठा दबाव होता. या समितीमधील काही सदस्यांनी रेपो दर कपातीचा आग्रह सुद्धा धरला होता. केंद्र सरकार पण रेपो दर कपातीसाठी आग्रही होते. पण आरबीआय हा निर्णय घेण्यास हिंमत करत नव्हती .

![]()















