घटना CCTV मध्ये कैद

नाशिक : शहरातील गुन्हेगारीने आपले तोंड वर काढण्यास सुरवात केली असून काही दिवसांपूर्वी पंचवटी परिसरात गोळीबाराची घटना ताजी असताना आज नाशिक शहरातील नामवंत बिल्डरच्या घरावर गोळीबार आणि दगडफेकीची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार नाशिकच्या दिंडोरीरोड परिसरात एका नामवंत बिल्डरचे घर असून आज (ता. 7,2025) शुक्रवारी सकाळी 4.37 वाजेच्या दरम्यान त्यांच्या घरावर दोन व्यक्तींनी गोळीबार व दगडफेक केली.
व्हायरल व्हिडीओत दोन तरुण बिल्डर राहत असलेल्या परिसरात आले. दोघांनी आपली ओळख लपवण्यासाठी तोंडाला कपडा बांधला होता. दरम्यान, एकाने बंदूक काढून बिल्डरच्या घराच्या दिशेनं गोळीबार केला. तर दुसऱ्या हल्लेखोराने दगडफेक केली. गोळीबार गेल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. दोन दिवसांपूर्वीच या बिल्डरच्या घरासमोर उभ्या असलेल्या कारची देखील तोडफोड करण्यात आली होती.भल्या पहाटे अशाप्रकारे गोळीबार केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले असून गोळीबाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अज्ञातानी घरावर गोळीबार करून पळ काढला असून या हल्ल्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

![]()















