• Latest
  • Trending
पोलिसांनी वेषांतर करत ‘बांगलादेशी’ केले गजाआड

पोलिसांनी वेषांतर करत ‘बांगलादेशी’ केले गजाआड

February 6, 2025
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

पोलिसांनी वेषांतर करत ‘बांगलादेशी’ केले गजाआड

YOU MAY ALSO LIKE

नाशिकमध्ये मित्राने मोबाईलचा रिमोट ॲक्सेस घेतला आणि विवाहितेने जीवन संपवलं

नाशिकचा ‘तो’ नेता तुरुंगातून लढविणार निवडणूक

बांगलादेशी नागरिकांकडे मिळून आले भारतीय आधारकार्ड, पॅनकार्ड

नाशिक :  सध्या राज्यभरात बांगलादेशी नागरिकांचा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजत असून नाशिक लगत असलेल्या मालेगावमध्ये अवैधरित्या राहत असलेल्या बांगलादेशीना जन्मदाखले दिल्याचे प्रकरण उजेडात आले आहे यामध्ये तर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मालेगाव म्हणजे बांगलादेशी आणि रोहिग्याना “भारतीय” करण्याचा अड्डा असल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून राज्य सरकारकडून सर्वच जिल्ह्यांना याबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यानुसार नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पोलिसांना  बांगलादेशी घुसखोरांबाबत शोधमोहीम राबविण्याची सूचना केली होती त्यानुसार पोलिसांनी शोध मोहीम राबविली असता  नाशिकमध्ये अवैधरित्या राहणाऱ्या 8 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.यामुळे मात्र शहरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांकडून अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांचा शोध सुरू असतानाच शहरातील एका बांधकाम साईडवर 600 कामगार काम करत असून यामध्ये काही कामगार हे बांगलादेशी नागरिक असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी 4 ते 5 दिवसांपासून वेषांतर करून त्यांच्यावर पाळत ठेवले यामध्ये पोलीस हे मजूर आणि सुपरवायझरचा वेष धारण करत त्याठिकानची रेकी करत होते.यादरम्यान पोलिसांना याठिकाणी बांगलादेशी नागरिक असल्याची खात्री पटली आणि छापा टाकत 8 बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी गजाआड  करण्यात यश मिळविले. त्यातील 3 जणांकडे भारतीय आधारकार्ड व पॅनकार्ड मिळून आले.  त्याचबरोबर त्यांच्याकडे बांगलादेशी ओळखपत्र, शाळेचा दाखला, जन्म दाखला आढळून आला आहे.  या 8 जणांपैकी 1 बांगलादेशी नागरिक  गेल्या 12 वर्षांपासून भारतात वास्तव्यास असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इतर काही महिन्यांपूर्वी नाशिक शहरात आल्याचे समजते.या बांगलादेशी नागरिकांना भारतात पाठवणारे रॅकेट काम करत असून पश्चिम बंगालमधील एजंटच्या माध्यमातून भारतात अवैधरित्या प्रवेश करत असल्याचा संशय पोलिसांना असून त्याचबरोबर  त्यांचे कुटुंबिय बांगलादेशात आहेत. बांगलादेशी नागरिकांचे कलकत्तामधील बँकेत खाते असून, या खात्यावर पैसे जमा केले जातात. या बँकेतून पैसे बांगलादेशात ट्रान्सफर केले जात असल्याचे तपासात समोर आले आहे.या बांगलादेशी नागरिकांना कोणी आश्रय दिला ?  बनावट कागदपत्रे कोणी बनवून दिलीत ? त्यांना नोकरी कशी मिळाली याचा तपास पोलिसांनी सुरू केला असून त्यांच्याविरूद्ध आडगाव पोलिस ठाण्यात परकीय नागरिक कायदा व बनावट कागदपत्रे बनवून त्याद्वारे फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ही महत्वाची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार पोलीस उप आयुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल, सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास चव्हाणके प्रविण माळी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेरखान पठाण,  किशोर देसले,  बाळु बागुल, नामदेव सोनवणे, पोलीस हवालदार गणेश वाघ, समिर चंद्रमोरे,  मनिषा जाधव, वैशाली घरटे, अतुल पाटील,  गौरख खांडरे, युवराज कानमहाले, यांच्या पथकांनी केली.  अटक केलेल्या बांगलादेशी नागरिकांची नावे— सुमन कालाम गाझी (वय २७), अब्दुला अलीम मंडल (३०), शाहीन मफिजुल मंडल (२३), लासेल नुरअली शंतर (२३), आसाद अर्शदअली मुल्ला (३०), आलीम सुआनखान मंडल (३२), अलअमीन आमीनुर शेख (२२), मोसीन मौफीजुल मुल्ला (२२) अशी आहेत

Loading

Previous Post

“त्या” घोटाळ्यात महापालिका, महसूल अधिकारी आहेत का ?

Next Post

नाशकात बिल्डरच्या घरावर गोळीबार अन् दगडफेक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White