• Latest
  • Trending
डावेमुक्त भारत तर ममता दीदी टाटा गुड बाय !

डावेमुक्त भारत तर ममता दीदी टाटा गुड बाय !

May 4, 2026
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

डावेमुक्त भारत तर ममता दीदी टाटा गुड बाय !

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

ममता बॅनर्जींच्या घराजवळ ‘जय श्री राम’च्या घोषणा

नाशिक : देशातील पाच राज्यांतील बहुचर्चित विधानसभा निवडणुकीचा निकाल आज (सोमवारी) जाहीर झाला. या निवडणुकांमध्ये केरळ आणि तामिळनाडू वगळता भाजपला प्रचंड मोठे यश मिळाले. आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता आली आहे. तामिळनाडूत विजय थलपतिच्या टीव्हीके पक्षाने द्रमुक आणि अण्णाद्रमुकला मागे टाकून 100 पेक्षा अधिक जागा जिंकल्या आहेत. भाजपने ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसची सत्ता उलथवून पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापन केली आहे. गेली 15 वर्षे पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची सत्ता होती. मात्र, ममता बॅनर्जी यांचा दारुण पराभव झाल्याने आता भारतामधील आणखी एक राज्य भाजपच्या ताब्यात आले आहे. यामुळे देशातील भाजपशासित राज्यांची संख्या वाढली आहे. पश्चिम बंगालच्या विजयानंतर आता देशातील 22 राज्यांमध्ये भाजप किंवा भाजप आघाडीचे सरकार असेल. हे भाजपसाठी खूप मोठे यश मानले जात आहे. तर दुसरीकडे केरळच्या रुपाने डाव्यांचा शेवटचा किल्लाही पडला आहे. केरळमधून डाव्यांचे सरकार गेल्याने आता ‘डावेमुक्त भारत’ झाला आहे. या ठिकाणी काँग्रेस पक्षाने बाजी मारली आहे. दुसरीकडे अजून एक मोठा धक्का तृणमूल काँग्रेस ला बसला असून या पक्षाच्या सर्वेसर्वा तथा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा या निवडणुकीत विजय होणार की पराभव? याकडे संपूर्ण देशाचेच लक्ष लागले होते. दरम्यान, आता ममता बॅनर्जी यांच्या भवानीपूर या मतदारसंघाचा निकाल समोर आला असून ममता बॅनर्जी यांना जबर धक्का बसला आहे. ममता बॅनर्जी यांचा या मतदारसंघातून पराभव झाला आहे. विशेष म्हणजे भाजपाचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी तब्बल 15 हजार मतांनी ममता बॅनर्जी यांना पराभूत केले आहे.विशेष म्हणजे या निवडणुकीत तृणमूलचे अनेक दिग्गज नेते पराभूत झाले आहेत. पश्चिम बंगालमध्ये एकूण 293 जागांसाठी निवडणूक झाली होती. यापैकी 208 जागांवर भाजपाचा विजय झाला आहे. तर तृणमूल काँग्रेसचा फक्त 79 जागांवर विजय झाला आहे. काँग्रेसला दोन जागा तर डाव्या पक्षांना दोन जागा मिळाल्या आहेत. एमआयएम पक्षाला एकही जागा जिंकता आलेली नाही. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कोलकात्यातल्या कालीघाट परिसरातील निवासस्थानाजवळ सोमवारी (4 मे) सुरक्षा कडक करण्यात आली. वृत्तानुसार, काही लोकांनी ममता बॅनर्जी यांच्या घराजवळ ‘जय श्री राम’ अशा घोषणा दिल्या होत्या. त्यानंतर निवडणूक आयोगाने सुरक्षेसंदर्भातील सूचना दिल्या. तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि डीएमके प्रमुख एम. के. स्टॅलिन यांचा कोलाथूर विधानसभा मतदारसंघातून पराभव

टीव्हीकेचे व्ही. एस. बाबू यांनी त्यांचा 8795 मतांनी पराभव केला. व्ही. एस. बाबू यांना 82,997 मतं मिळाली, तर स्टॅलिन यांना 74,202 मते मिळाली.

स्टॅलिन 2011 पासून या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होते.

तामिळनाडूमध्ये मुख्यमंत्रीपदावर असताना पराभव होणारे स्टॅलिन हे चौथे राजकीय नेते ठरले आहेत. . आसाममधील जोरहाट विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार गौरव गोगोई यांचा निवडणुकीत पराभव झाला आहे.

भाजपचे हितेंद्र नाथ गोस्वामी यांनी त्यांचा 23 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला.

Loading

Previous Post

नाशकात आंघोळीचा साबण खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू

Next Post

आणि विजयने तिच्यासाठी 27 वर्षाचा संसार मोडला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White