लॉज,हॉटेलची कसून तपासणी सुरू

नाशिक : भारत-पाक मध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर त्याचबरोबर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमध्ये घुसून एअर स्ट्राईक केल्यानंतर नाशिकमध्ये महत्वाच्या स्थळांवरील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून गांधीनगर, नाशिकरोड, देवळाली कॅम्प, जेलरोड, भगूर, आडगाव आदी उपनगरांमध्ये संरक्षण खात्याशी संबंधित महत्त्वाच्या आस्थापना आहेत. यामुळे या या आस्थापनांच्या सुरक्षेवर पोलिसांकडून लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्याचबरोबर काळाराम मंदिरांसह महत्वाच्या आस्थापनांची पोलिसांकडून तपासणी करण्यात येत आहे. शहरातील गर्दीच्या पर्यटनस्थळांवर सुद्धा दररोज बॉम्ब शोधक-नाशक पथकाकडून तपासणी केली जाणार असल्याचे समजते. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सर्व पोलीस ठाण्यांकडून सुरक्षेचा आढावा घेतला. शहरात पोलीस पेट्रोलिंग वाढविण्यात आली आहे. त्याचबरोबर पोलिसांकडून लॉज, हॉटेलचीही कसून तपासणी करण्यात येत आहे .केंद्र सरकारकडून येणाऱ्या सूचना वेळोवेळी नागरिकांपर्यंत पोहचविण्यात येतील नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. असे आवाहन जिल्हाधिकारी शर्मा यांनी केले आहे. सोशल मीडियावर लक्ष… दोन समाजात, दोन धर्मात तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर सायबर सेलचे बारकाईने लक्ष असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

![]()















