पाकच्या कराचीबंदरावर समुद्रमार्गे भारताचे जोरदार हल्ले

वृत्तसंस्था : भारताने पाकिस्तानवरील हल्ल्याची तीव्रता वाढवली असून इस्लामाबाद, लाहोर, सियालकोट, कराचीवर हल्लाबोल केला आहे. पाकिस्तानला भारताने आता जोरदार प्रत्युत्तर दिलं असून लाहोरनंतर आता थेट राजधानी इस्लामाबादवर हल्ला केला आहे. भारताच्या क्षेपणास्त्रांनी आता इस्लामाबादवर हल्ला केल्याची माहिती आहे. भारताच्या हल्ल्यानंतर इस्लामाबादमध्ये सायरनचे आवाज येत असून गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानने भारताच्या नागरी वस्तीवर हल्ला केल्यानंतर तो हल्ला भारताच्या एअर डिफेन्स सिस्टिमने निकामी केला. त्यानंतर आता भारताने पाकिस्तानला जशास तसं उत्तर देत आधी लाहोरवर हल्ला केला. त्यानंतर पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादला लक्ष्य करत हल्ला केला. पूर्ण पाकिस्तान अंधारात… भारताच्या प्रतिहल्ल्यानंतर पाकिस्तानच्या अनेक भागात ब्लॅकआऊट करण्यात आलं आहे. पाकव्याप्त काश्मीर पूर्ण अंधारात गेलं आहे. त्याचबरोबर भारताने देशाविरुद्ध प्रपोगंडा पसरवणारे 8 हजार एक्स अकाउंट तातडीने बंद करण्यात आली आहेत. हा निर्णय भारत सरकारने घेतला असून भारताच्या तिन्ही सेना तयारीत आहेत. काही वेळात हाती आलेल्या माहितीनुसार आयएनएस विक्रांतवरून पाकिस्तानमध्ये जोरदार हल्ले सुरू झाले असून अवकाशाबरोबरच आता समुद्रामार्गे पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ले सुरू झाले असून 10 पेक्षा अधिक स्फोट झाल्याचे सूत्र सांगतात.भारताने आतापर्यंत पाकिस्तानचे 50 मिसाइल पाडण्यात यश मिळविले आतापर्यंत भारताचे कुठलेही नुकसान झालेले नाही

![]()















