“लाहोर सोडा” अमेरिकेच्या आपल्या नागरिकांना सूचना

वृत्तसंस्था : काल पाकिस्तानमध्ये घुसत भारताने अवघ्या 25 मिनिटात अतिरेक्यांची 9 ठिकाणे उद्धवस्त केली. यामध्ये 100 अतिरेक्यांचा खात्मा करण्यात भारताला यश आले. त्यानंतर चवताळलेल्या पाकिस्तानने भारतातील 15 शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्याला भारतीय लष्कराने जोरदार प्रत्युत्तर दिले. अवंतीपुरा,श्रीनगर, जम्मू, पठाणकोट,अमृतसर, कपूरथला,जालंधर, लुधियाना,उधमपूर, भटिंडा, चंदीगड,नाल, पालोडी,उत्तरलाई,भुज या 15 शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न पाकिस्ताननं केला होता. तो प्रयत्न भारतानं हाणून पाडला आहे.काल रात्री, भारतीय हवाई दलाच्या एस-400 सुदर्शन चक्र हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीने भारताच्या दिशेने पाकिस्तानने सोडलेल्या मिसाईलवर गोळीबार केला. या कारवाईत मिसाईल निष्प्रभ करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.आज सकाळी भारताच्या सशस्त्र दलांनी पाकिस्तानातील अनेक ठिकाणांवरील हवाई सुरक्षा यंत्रणा आणि रडार यांना लक्ष्य केले. भारताने पाकिस्तानला त्यांच्याच पद्धतीने उत्तर दिले आहे. लाहोरमधील एक हवाई सुरक्षा यंत्रणा उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे. ८ मे २०२५ रोजी पहाटे पाकिस्तानातील अनेक हवाई संरक्षण रडार आणि यंत्रणांवर हल्ले करण्यात आले .यामध्ये लाहोर येथील एक हवाई संरक्षण यंत्रणा पूर्णपणे निष्क्रिय करण्यात आली.पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टम आणि संरक्षण क्षेपणास्त्र प्रक्षेपकांच मोठे नुकसान झाले आहे. पाकिस्तानला चीनकडून HQ-9 एअर डिफेन्स सिस्टीम मिळाली आहे. ही सिस्टीम जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली आहे. चायना प्रिसिजन मशिनरी इम्पोर्ट-एक्सपोर्ट कॉर्पोरेशनने ही प्रणाली विकसित केली. पाकिस्तानने २०२१ मध्ये ही यंत्रणा आपल्या लष्करात समाविष्ट केली होती.

हल्ल्याचा परिणाम पाकिस्तानी नागरिकांच्या मनावर इतका झाला की, पाकिस्तानच्या संसदेत एक खासदार परिस्थितीवर भाष्य करताना ढसाढसा रडताना दिसला आहे.भारताच्या हल्ल्यानंतर लाहोर, कराची आणि इस्लामाबाद येथील विमानतळ बंद करण्यात आले आहेत. पाकिस्तानमध्ये आपातकालीन बैठक बोलावण्यात आली आहे. इस्लाबाद येथील विमानतळाजवळ ड्रोन हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर विमानतळ बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

लाहोर तत्काळ सोडा अमेरिकेने आपल्या नागरिकांना सांगितले आहे की जर लाहोर सुरक्षितपणे सोडणे शक्य असेल तर त्यांनी तेथून निघून जा, दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी रहावे.

![]()















