इंदिरानगर परिसरातील नागरिकांचा संताप

नाशिक : इंदिरानगर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून मध्यरात्री व दिवसा वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे .काल रात्री इंदिरानगर परिसरात वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांचे अतोनात हाल झाले असून त्यामध्ये उन्हाळा सुरू झाल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांनी अर्धी रात्र घामानंच्या धारेत काढल्यानंतर रात्री 1.30 च्या सुमारास वीज आली. त्यानंतर देखील वीज मध्ये-मध्ये बंद होण्याचे प्रकार होत होते. आज देखील होळीचा सण नागरिक उत्साहात साजरा करत असताना इंदिरानगर, विनयनगर या भागात संध्याकाळी 5 वाजेपासून तर अद्यापपावतो (रात्री 9.30) वीज पुरवठा खंडित असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. यादरम्यान उबाठा गटाचे ऋषिकेश वर्मा यांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना ताळे ठोको आंदोलनाचा इशारा दिला असून सामाजिक कार्यकर्ते प्रवीण जाधव व मनसे अध्यक्ष धीरज भोसले यांनी देखील महावितरणच्या गलथान कारभाराचा संताप व्यक्त केला आहे.

![]()















