• Latest
  • Trending

नाशकात होळीच्या सणाला गालबोट, तरुणाचा खून

March 13, 2025
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशकात होळीच्या सणाला गालबोट, तरुणाचा खून

YOU MAY ALSO LIKE

नाशिकमध्ये मित्राने मोबाईलचा रिमोट ॲक्सेस घेतला आणि विवाहितेने जीवन संपवलं

नाशिकचा ‘तो’ नेता तुरुंगातून लढविणार निवडणूक

सिडकोतील गुन्हेगारी व भाईगिरी पुन्हा चर्चेत

नाशिक : शहरात होळीचा सण नागरिक उत्सवात साजरा करत असतानाच सिडको परिसरात तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सिडको परिसरातील शुभम पार्क येथील सेंट जोसेफ चर्च समोर ही घटना घडली असून सुमित सुरेश देवरे (२२) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून त्याचा मित्र अरुण वैरागड याच्याशी काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. सुमित हा डीवायइन कॉलेज, सटाणा येथे शिक्षण घेत होता. तो होळी सणाच्या निमित्ताने नाशिकला आला होता. अशातच आज रात्रीच्या दरम्यान तो शुभम पार्क येथील सेंट जोसेफ चर्च समोर आला असता अरुण वैरागड व त्याचे तीन ते चार साथीदार हे दुचाकीवरून त्या ठिकाणी आले व त्यांनी जुन्या भांडणाची कुरापत काढून सुमितवर धारदार शस्त्राने वार केले. या घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी लागलीच जखमी सुमितला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले.यावेळी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी जमा झाली होती. यावेळी पोलिसातर्फे तत्काळ फॉरेन्सिक टीम तसेच श्वान पथकाला देखील पाचरण करण्यात आले. दरम्यान या घटनेनंतर मारेकरी घटनास्थळावरून पळून गेले असल्याने पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी विशेष पथके तैनात केली तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्यांचा शोध सुरू करण्यात आला. घटनेची माहिती समजताच पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त परिमंडळ २ मोनिका राऊत, सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख, गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, यांच्यासह अंबड पोलीस ठाण्याचे व गुन्हे शाखेचे पोलीस पथक घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत अंबड पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.सणासुदीच्या दिवशी घडलेल्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.मात्र पुन्हा एकदा या खुनामुळे सिडकोतील गुन्हेगारी व भाईगिरी थांबलेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Loading

Previous Post

ऐन सणासुदीला विजेचा लपंडाव

Next Post

दुहेरी हत्याकांडाने नाशिक हादरलं !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White