न्यूझीलंड विरोधात 25 वर्षे जुना बदला घेतला

नाशिक : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडवर शानदार विजय मिळवला आहे.चॅम्पियन्स ट्रॉफीच्या या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने टीम इंडियाविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीत किवी संघाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. पहिल्या विकेटसह, भारतीय गोलंदाजांनी आपली पकड घट्ट केली आणि नियमित अंतराने यश मिळवले.
डॅरिल मिशेल आणि मायकेल ब्रेसवेल यांनी किवी संघासाठी निश्चितच काही वेळ क्रीजवर घालवला. दोघांनीही न्यूझीलंडकडून अर्धशतकी खेळी केली. टीम इंडियाकडून कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती यांनी गोलंदाजीत आपली हुशारी दाखवली आणि प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. याशिवाय मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. अशाप्रकारे टीम इंडियाने निर्धारित 50 षटकांत न्यूझीलंडला फक्त 251 धावांवर रोखले. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने आपल्या तुफानी फलंदाजीने खळबळ उडवून दिली. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. जिथे न्यूझीलंडविरुद्ध 252 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरली आहे. कॅप्टन रोहितने शर्माने टीमला एक चांगली सुरुवात करुन दिली. अवघ्या 41 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकत न्यूझीलंड विरोधात 25 वर्षे जुना बदला घेतला.2000 साली चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये न्यूझीलंडकडून हरल्याने टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीचे स्वप्न भंगले होते. चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची टीम इंडियाची ही तिसरी वेळ आहे. याआधी 2002 साली सौरभ गांगुलीच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा, त्यानंतर 2025 साली एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा आणि आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. भारताने शेवटची चॅम्पियन्स ट्रॉफी 2013 मध्ये जिंकली होती.

![]()















