केंद्र सरकारचा मोठा निर्णय

नाशिक: विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने मास्टर स्ट्रोक मारला असून केंद्रीय मंत्री मंडळाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मराठीसह पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला आहे. मराठी, बंगाली, पाली, प्राकृत आणि आसामी या पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे आता अभिजात भाषांची एकूण संख्या 11 वर पोहचली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाने मराठी भाषा सातासमुद्रापार जगभरात आणखी जास्त वेगाने आणि प्रभावीपणे पोहोचणार आहे. अभिजात भाषेचा दर्जा भेटला, आता होणारे फायदे ?
1)अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यास स्कॉलर्ससाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळतात.
2)अभिजात भाषेचा दर्जा मिळल्यानंतर सेंटर ऑफ एक्सलंन्स फॉर स्टडीज स्थापन करण्यात येते.
3)अभिजात भाषेला प्रत्येक विद्यापीठात एक अध्यासन केंद्र स्थापन केलं जातं. भाषा अभिजात कशी ठरते ? 1) भाषेचा नोंदवलेला इतिहास हा अतीव प्राचीन स्वरूपाचा म्हणजे 1500-2000 वर्षं जुना हवा.
2) प्राचीन साहित्य हवं, जे त्या भाषिकांना मौल्यवान वारसा वाटतं.
3) दुसर्या भाषासमूहाकडून उसनी न घेतलेली अस्सल साहित्यिक परंपरा हवी.
4) ‘अभिजात’ भाषा ही आजच्या भाषेपेक्षा निराळी हवी.



![]()














