
नवी दिल्ली: लग्नाच्या खोट्या वचनांचे पुरावे नसतील तर महिलेने विचारपूर्वक ठेवलेल्या शारीरिक संबंधांना फसवणूक म्हणता येणार नाही. असा महत्त्वपूर्ण निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायमूर्ती अनुप कुमार मेहंदी रक्ता यांनी हा निर्णय दिला. या प्रकरणात एका महिलेने एका व्यक्तीवर बलात्काराचा आरोप केला होता. नंतर दोघांनी लग्न करून हे प्रकरण परस्परात मिटून घेतले. हे प्रकरण दोघांनी सहमतीने मिटविले असल्याने पुरुषाविरोधातील बलात्काराचा खटला रद्द करण्यात येत आहे. असे न्यायमूर्ती म्हटले या प्रकरणी महिलेने आपल्या मूळ तक्रारीत म्हटले होते की आरोपीने लग्न करण्याचे आमिष दाखवून आपल्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले मात्र नंतर लग्न करण्यास नकार दिला आपल्या परिवाराने आपले दुसऱ्या मुली सोबत लग्न ठरवले आहे. असे कारण त्यांनी सांगितले नंतर दोघात समजवता होऊन दोघांनी लग्न केली याची माहिती उच्च न्यायालयात देण्यात आली. महिलेने न्यायालयात सांगितले की तक्रार गैर समजूतीतून दाखल झाली होती. परिवाराच्या विरोधामुळे त्यांनी माझ्याशी लग्न करण्यास असमर्थ दर्शवली होती वास्तविक तसा त्याचा मूळ हेतू नव्हता आता मी त्या व्यक्तीसोबत आनंदाने राहत आहे. हा खटला मी पुढे चालू इच्छित नाही यावर न्यायालयाने म्हटले की या प्रकरणाचा तपास सुरू असताना आरोपी पुरुषांने स्वेच्छेने महिलेसोबत लग्न केले त्यामुळे त्यांने दिलेले लग्नाचे वचन मोडण्याच्या हेतूनेच दिले होते असे म्हणता येत नाही.भादवी कलम 376 (बलात्कारासाठी शिक्षा) अन्वये कारवाई सुरू ठेवण्या ऐवजी खटला रद्द करणे योग्य आहे. त्यामुळे दोघांचे वैवाहिक जीवनातील सामंजस्य टिकून राहील.

![]()











