• Latest
  • Trending
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
स्वीकृत साठी भाजपमधून 300 नावे वरिष्ठांकडे

स्वीकृत साठी भाजपमधून 300 नावे वरिष्ठांकडे

October 6, 2026
News Black & White
Saturday, October 17, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

नाशिक : (ब्लॅक अँड व्हाईट वृत्तसेवा)  मराठीतील दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन झाले आहे. गोव्यात त्यांनी वयाच्या 75 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.नाना पाटेकर यांना 8 ऑक्टोबर रोजी सकाळी त्यांना हृदय विकाराचा झटका आला. त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या मुलाने दिलेल्या माहितीनुसार ते गोव्यात होते. पहाटे 5.22 वाजता त्यांना तीव्र हृदय विकाराचा झटका आला. त्यांना गोव्यातील रुग्णालयात लगेचच भरती केले. डॉक्टरांनी त्यांना 45 मिनिटं सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. पण काळाने घाला घातलाच… 75 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.         नाना पाटेकर यांची कारकीर्द
नाना पाटेकर यांची गणना चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम अभिनेत्यांमध्ये केली जाते. नाना पाटेकर यांचे पूर्ण नाव विश्वनाथ पाटेकर असे होते. त्यांचा जन्म 1 जानेवारी 1951 मध्ये झाला. त्यांनी 1978 मध्ये ‘गमन’ या चित्रपटाद्वारे अभिनयात पदार्पण केले, परंतु 1986 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अंकुश’ या चित्रपटामुळे त्यांना खरी ओळख मिळाली. आपल्या कारकिर्दीत त्यांनी हिंदी आणि मराठी अशा दोन्ही चित्रपटसृष्टींमध्ये काम केले आहे. ‘परिंदा’, ‘तिरंगा’, ‘क्रांतिवीर’ आणि ‘खामोशी’ यांसारख्या चित्रपटांतून त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आणि आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी गंभीर भूमिकांपासून ते विनोदी आणि खलनायकी अशा विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. ‘परिंदा’ मधील गँगस्टरच्या भूमिकेने सुपरहिट केले. त्यानंतर ‘प्रहार’, ‘तिरंगा’ व ‘क्रांतिवीर’ यांसारख्या चित्रपटांतून त्यांनी आपली ‘ॲक्शन-ओरिएंटेड’ अभिनेता म्हणून छाप पाडली. ते शेवटचे हाऊसफुल 5 मध्ये दिसले होते. नाना पाटेकर यांच्या निधनाचे वृत्त समजताच अवघा महाराष्ट्र हळहळला. त्यांचे चिरंजीव मल्हार पाटेकर हे गोव्याच्या दिशेने रवाना झाले. संध्याकाळपर्यंत त्यांचे पार्थिव पुण्यातील निवासस्थानी आणण्यात येईल, असा अंदाज आहे.

Loading

Previous Post

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

Next Post

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White