रस्त्यांचे खोदकाम,वाहतूक कोंडी,सूक्ष्म कण, या तिहेरी संकटामुळे नाशिककरांना सध्या प्रदूषणाचा मोठा त्रास

नाशिक : (ब्लॅक अँड व्हाईट वृत्तसेवा) नाशिक शहराची ओळख ही धार्मिकतेबरोबरच शुद्ध हवेसाठी प्रसिद्ध आहे. मात्र ही ओळख आता बदलत असून नाशिकची हवा दिल्ली पेक्षाही खराब नोंदविली गेली आहे .ऑक्टोबर महिन्यात पहिल्यांदाच हवा गुणवत्ता निर्देशांक ( एक्यूआय ) 152 वर पोहोचला आहे. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्याप्रमाणात सुरू असलेली खोदकामे, रस्त्यांची कामे, बांधकामातून उडणारी धूळ आणि प्रमुख चौकातील वाहतूक कोंडी यामुळे हवेचा दर्जा दिवसेंदिवस खालावत आहे. नाशिकचा एक्यूआय 152 वर पोहोचला म्हणजेच हवा आता आरोग्यासाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. शहरातील हवा तपासणी केंद्रावर पीएम 2.5 या सूक्ष्मधुलीकडांचे प्रमाण अधिक असल्याची माहिती आहे. हे कण श्वसन मार्गातून थेट फुफुसांपर्यंत पोहोचू शकतात. परिणामी सर्दी, खोकला, घसा खवखवणे, श्वास घेण्यास त्रास होण्याच्या तक्रारी वाढत आहेत. शहरातील इंदिरानगर, गंगापूर रोड, कॉलेज रोड, त्रंबक रोड, द्वारका, मुंबई नाका, त्याचबरोबर रविवार कारंजा व पंचवटी या परिसरात वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात होत आहे सिहस्तांच्या कामासह विविध विकास कामांसाठी रस्त्यांवर खोदकाम सुरू असल्याने धुळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. कोंडीत अडकलेल्या वाहनांचा धूर आणि बांधकाम स्थळांवरील धुलीकन हवेत मिसळत आहेत. बांधकाम स्थळी आच्छादन करणे, धुळ उडू नये म्हणून पाण्याची फवारणी करणे, आणि रस्ते स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. मात्र उपायोजनांची प्रभावी अशी अंमलबजावणी होत नसल्याने प्रदूषणात मोठ्या प्रमाणात भर पडत आहे.


![]()












