11000 च्या साहित्यासाठी महापालिका मोजते 21000

नाशिक : (ब्लॅक अँड व्हाईट वृत्तसेवा) महापालिकेत गेल्या काही महिन्यांपासून घोटाळ्यांची मालिका सुरू असून म्हाडा घोटाळा, टेंडर होल्डिंग घोटाळा त्यानंतर आता लहान मुलांच्या खेळणी आणि बसण्याच्या बाकड्यामध्ये झालेल्या घोटाळ्या मुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. महापालिकेची मासिक सभा मंगळवारी पार पडली. यावेळी सदस्यांच्या प्रश्न उत्तराच्या वेळेत नगरसेवक कैलास मुदलियार यांनी उद्यान विभागातील अनियमितेवर बोट ठेवले. शहरातील उद्यानांमध्ये बेंचेस, खेळणी व अन्य साहित्य बसविण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. आठ मक्तेदारांनी निविदा प्रक्रियेत सहभाग घेतला यातून चार मक्तेदार निश्चित करण्यात आले यामध्ये क्रांती इंडस्ट्रीज, रेन झील फिटनेस प्रायव्हेट लिमिटेड, श्री इच्छामणी एंटरप्राइजेस, मेसर्स भूमी एंटरप्राइजेस, यांना कामे देण्यात आली. उद्यानांवर निधी खर्च करताना नगरसेवक निधीतून खर्च करण्यासाठी पत्र घेण्यात आली. प्रभाग क्रमांक 20 चे नगरसेवक मुदलियार यांनी साहित्य दरा संदर्भात उद्यान विभागाचे अधीक्षक भदाणे यांच्याकडे मागणी केली. मात्र या दरम्यान लेखी उत्तरे देण्यास टाळाटाळ करण्यात आली. महासभेच्या आदल्या दिवशी घाईघाईत उत्तरे देण्यात आली. त्यापूर्वी महापालिकेतील उद्यान साहित्य खरेदी करण्यासाठी निश्चित केलेल्या दरांची बाजारात पडताळणी करण्यात आली. त्यात महापालिकेने ठेकेदारांना निश्चित केलेल्या दरामध्ये व बाजारातील दरामध्ये 40 ते 50 टक्क्यांची तफावत मिळून आली विशेष म्हणजे नगरसेवकांना साहित्य खरेदी करताना ठरवून दिलेल्या मक्तेदारांकडून साहित्य खरेदी करणे बंधनकारक करण्यात आल्याने या विभागाच्या कामकाजावरचा संशय वाढल्याचे कैलास मुदलियार यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. उद्यान विभागाचे अधीक्षक भदाणे यांनी बाकड्यांचे दर निश्चित करताना वाहतूक व बाकडे बसविण्याचा खर्च समाविष्ट असल्याची सर्वसाधारण माहिती दिली. मात्र सदस्यांनी हा मुद्दा खोडून काढला नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी देखील उद्यान विभागाच्या कामकाजावर संशय व्यक्त केला निवेदी प्रक्रिया यापूर्वीच पार पडली अंतिम प्रक्रिया सुरू असताना दर जुळत नव्हते म्हणून पुनर्निविदा काढण्यात आली वास्तविक निविदा प्रक्रियेमध्ये बारा ते पंधरा मक्तेदार कंपन्या सहभागी असताना निविदा प्रक्रिया पुन्हा का राबविली असा सवाल बडगुजर यांनी उपस्थित केला. उद्यान विभागाकडून प्राप्त झालेले उत्तर समाधानकारक नसल्याने व सदस्यांनी केलेल्या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर उद्यान अधीक्षक भदाणे यांना येत्या दहा दिवसात लेखी स्वरूपात स्पष्टीकरण देण्याच्या सूचना महापौर आडके यांनी केल्या लाखांचा दर फरक नासिक महापालिकेने आणि बाजारातील दरातील तफावत दर्शविणाऱ्या तक्त्यानुसार महापालिकेने मंजूर केलेला दर आणि प्रत्यक्षात बाजारातील दर यामध्ये मोठी तफावत आहे एकूण 53 वस्तूंचा विचार केला असता महानगरपालिकेने मंजूर केलेली एकूण रक्कम रुपये 81,74,919इतकी आहे तर बाजारात याच वस्तूंसाठी फक्त 38,73,206 इतका दर दिला आहे. म्हणजेच या व्यवहारात जवळपास 42 लाख 82 हजार 613 चाथेट फरक असल्याचा आरोप नगरसेवक कैलास मुदलियार यांनी केला प्रत्येक वस्तूमध्ये जवळपास दुप्पट ते तिप्पट दराची आकारणी करण्यात आली आहे.


![]()












