भाजपमधून आजी-माजी शहराध्यक्ष आमदार पुत्रांच्या नावांचा आग्रह

नाशिक : (ब्लॅक अँड व्हाईट वृत्तसेवा) महापालिका निवडणुकीनंतर तब्बल नऊ महिन्यांपासून रखडलेल्या स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्ती प्रक्रियेला अखेर वेग आला आहे. या संदर्भात सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत 21 ऑक्टोंबर पर्यंत संबंधित पक्षांनी त्यांच्या जागांसाठी उमेदवारांची नावे सादर करण्याची अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पक्षीय संख्या बळ, जागांचे वाटप आणि उमेदवारांची नावे सादर करण्याच्या प्रक्रियेबाबत चर्चा करण्यात आली. सर्वच पक्षांकडून नावे प्राप्त झाल्यानंतर संबधित उमेदवारांचे अर्ज व आवश्यक कागदपत्रे स्विकारली जाणार आहेत. त्यानंतर पात्रता, कागदपत्रे आणि अन्य निकषांची छाननी करून पात्र उमेदवार निश्चित केले जातील. अंतिम प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र उमेदवारांची नावे महासभेत जाहीर केली जाणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. भाजप मधून 300 नावे वरिष्ठांकडून गेल्याने त्यातील कुणाची लॉटरी लागते याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले असून भाजपमधून आजी-माजी शहर अध्यक्ष आमदार पुत्रांच्या नावांचा आग्रह धरण्यात आला आहे. स्वीकृत सदस्यांच्या 10 जागांसाठी गेल्या काही महिन्यांपासून विविध पक्षांमध्ये इच्छुकांची मोठी संख्या असल्याने आता राजकीय हालचालींना वेग येणार आहे पक्षांकडून नावे मागविण्याची अधिकृत प्रक्रिया सुरू झाल्याने इच्छुकांचे लॉबिंग पक्षश्रेष्ठींच्या भेटीगाठी आणि नावांसाठी जोरदार मोर्चे नंदनी बांधणी सुरू होण्याची शक्यता आहे


![]()












