• Latest
  • Trending
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
स्वीकृत साठी भाजपमधून 300 नावे वरिष्ठांकडे

स्वीकृत साठी भाजपमधून 300 नावे वरिष्ठांकडे

October 6, 2026
News Black & White
Saturday, October 17, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

जीव गेल्यानंतर कंत्राटदाराला जाग

नाशिक : (ब्लॅक अँड व्हाईट वृत्तसेवा) शहरातील राजीव नगर 100 फुटी रस्त्यावर विकास कामासाठी मधोमध खोदलेल्या भल्या मोठ्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने दूधचाकी सह खड्ड्यात कोसळून सेवानिवृत्त उपअभियंता प्रकाश किशनराव  वानदेशकर (61 हेरंब सोसायटी इंदिरानगर) यांचा मृत्यू झाला. हा दुर्दैवी मृत्यू 13 वा खड्डेबळी असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. पाटबंधारे खात्यातून सेवानिवृत्त झालेले वानदेशकर हे कलानगर मार्गे राजू नगरकडे मुखेड दुचाकीने घराबाहेर काहीतरी खाद्यपदार्थ आणण्यासाठी गेले असता त्यांना राजूनगर येथून मार्गस्थ होताना खड्ड्याचा अंदाज आला नाही. खड्ड्यांपुढे काही अंतरावर थातूरमातूर लहान आकाराचे कमी उंचीचे बॅरीकेड जरी लावलेले छायाचित्र दिसत असले तरी सावधानतेचा इशारा देणारे रेडियम रिफ्लेक्टर सह सूचनाफलक ब्लिंकर्स दिवे संबंधित कंत्राट दादाकडून लावण्यात आलेले नव्हते. त्यामुळे वानदेशकर यांना येथील खंड्याचा अंदाज आला नसावा. आणि ते दुचाकी बरोबरच खड्ड्यात कोसळले असा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. तेरावा खड्डा बळी शहरात विकास कामांसाठी अनेक ठिकाणी खड्डे खोदून ठेवलेले आहे. त्या खोदलेल्या खड्ड्यांमुळे आत्तापर्यंत 12 नागरिकांना आपला जीव गमावा लागला आहे दरम्यान हा अपघात तेरावा खड्ड्या बळी असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. दुचाकी सह खड्ड्यात कोसळल्याची घटना घडल्याचे लक्षात येतात राजू नगर वसाहती मधील नागरिकांनी खड्ड्याजवळ धाव घेतली. यावेळी काही तरुणांनी तातडीने खड्ड्यात उतरून वानदेशकर यांना बाहेर काढले. त्यांना तातडीने युवकांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मूर्त घोषित केले.  प्रत्यक्षदर्शी काय म्हणतात ? कामाच्या ठिकाणी ठळक दिसणारे कुठलेही सूचनाफलक लावलेले नव्हते. तसेच ब्लिंकर दिवे सुद्धा बुधवारी रात्रीपर्यंत बंद होते. अगदी खड्ड्याभोवती एका बाजूने प्लास्टिकचे बॅरीकेड आणून लावण्यात आले आणि पांढऱ्या पट्ट्या बांधण्यात आल्या होत्या. दुर्घटनेपूर्वी खबरदारीचा उपाय म्हणून तटबंदी भक्कम केली असती तर ही दुर्घटना टळली असती असे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. घटना घडल्यानंतर कलानगरच्या बाजूने या धोकादायक खड्ड्याला लागूनच संबंधित कंत्राटदाराने गुरुवारी दुपारी चार वाजेच्या सुमाला दोन ट्रॅक्टर ट्रॉली भरून सिमेंटचे ब्लॉक आणून क्रेन ने उभे करण्यात आले. रात्री प्लास्टिकचे लावलेले बॅरिकेट हाटून कामगारांनी या ठिकाणी मजबूत असे सिमेंटचे ब्लॉकची तटबंदी उभारली याला उशिरा सुचणारे शहाणपण असे म्हटले जाईल.

नगरसेवकांचा संताप चौकशीची मागणी प्रभाग क्रमांक 30 मधील राजीव नगर येथे रस्त्याच्या सुरू असलेल्या कामासाठी खोदण्यात आलेल्या मोठ्या खड्ड्यात दुचाकी कोसळून 61 वर्षीय प्रकाश किसनराव वांदेशकर यांच्या मृत्यूच्या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. या दुर्घटनेला रस्ते काम करताना संबंधित व्यक्तीचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा दावा करत. ठेकेदार व अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी भाजपचे गटनेते नगरसेवक श्याम बडोदे, अजिंक्य साने, डॉ दिपाली कुलकर्णी, सुप्रिया खोडे, आदींनी केली आहे.

Loading

Previous Post

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

Next Post

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White