नवरात्र उत्सव मंडळाकडून पोलिसांनी मागितले एक लाखांचे सिक्युरिटी डिपॉझिट

नाशिक : (ब्लॅक अँड व्हाईट वृत्तसेवा) नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयाकडून सुमारे सातशे मंडळांसह गर्भा आयोजकांना अटी शर्तीसह परवानगी दिलेली आहे. विशेष गणेशोत्सवाप्रमाणे सार्वजनिक मंडळांना एक लाख तर खाजगी आयोजकांना 50 हजारांची अनामत रक्कम संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये भरणे बंधनकारक आहे. नियमांचे पालन करण्याची जबाबदारी संबंधित मंडळाचे पदाधिकारी व गर्भा आयोजकांवर असणार आहे. नियमांचे भंग करणाऱ्या विरोधात कारवाईचा इशाराही शहर पोलिसांनी दिला आहे. शहरात नुकताच गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडला विशेष शहरात प्रथमच मध्यरात्रीनंतर गणेश विसर्जन मिरवणूक पारंपारिक वाद्यात पार पडली त्यास धरतीवर नवरात्र उत्सव ही निर्भिक न होण्यासाठी कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. मर्यादित विजेच्या वापराला परवानगी असली तरी लेझर लाईटवर मात्र बंदी आहे. तसेच गरबा दांडियाचे आयोजन करणाऱ्या मंडळांना नियमांचे पालन करण्याचे आव्हान केले आहे. नियमांचे पालन न केल्यास आयुक्तालयाकडून संबंधित मंडळ आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. मात्र पोलिसांच्या जाचक अटीमुळे भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या घटनेची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर उत्सवा दरम्यान दोन्ही प्रदूषणा संदर्भात गुन्हा दाखल न झाल्यास संबंधित मंडळाला त्यांनी जमा केलेल्या धनादेश परत करण्यात येईल असे पोलिसांचे म्हणणे आहे. असे असले तरी एक लाखासारखी मोठी रक्कम सिक्युरिटी म्हणून देणे लहान मंडळांना शक्य होत नसल्याने उत्सव साजरा करावा की नाही अशी मनस्थिती कार्यकर्त्यांची झालेली आहे. त्याचबरोबर बहुतां सार्वजनिक उत्सवांचे अधिकृत रजिस्ट्रेशन नसते काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उत्साही सभासद पुढाकार घेऊन उत्सव पार पाडतात. घरोघरी जाऊन वर्गणी गोळा करणे आता कठीण झाले आहे कार्यकर्ते आपल्या परीने निधी जमा करून आणि जाहिरातीच्या आधारे उत्सव साजरा करत असतात त्यामुळे या जाचक अटींमुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

![]()












