नासिक महानगरपालिकेत स्वीकृत साठी माजी नगरसेवक विरुद्ध कार्यकर्ते

नाशिक : (ब्लॅक अँड व्हाईट वृत्तसेवा) महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. या पदासाठी सर्वच पक्षांमध्ये रांगा लागल्या आहेत. मुख्य म्हणजे स्वीकृत नगरसेवक पदासाठी 10 च जागा आहेत. मात्र रस्सीखेच मोठ्याप्रमाणात आहे.भाजपकडे देखील इच्छुकांच्या रांगा लागल्या आहेत. तर दुसरीकडे शिंदे गटाच्या शिवसेनेत देखील जोरदार हालचाली सुरू असून त्यांच्याकडे सुमारे 67 अर्ज आले आहेत. त्यामध्ये सत्तर टक्के हे महापालिकेत पराभूत झालेले नगरसेवक आहेत. यामध्ये स्वीकृत चा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार असून पक्षाने तयार केलेल्या अर्जात किती वर्षापासून कार्यरत आहे, पक्षाची कोणती पदे भूषवलेली आहेत, केलेली कामे, कोणत्या संस्थेवर काम करीत आहेत. अशा प्रकारची रकाने भरावी लागणार असून पक्षाचे वरिष्ठ नेते सर्व अर्ज तपासून निर्णय घेणार असल्याची माहिती मिळत आहे. तर दुसरीकडे भाजपकडून अद्याप देखील नाव निश्चिती झालेली नसून भाजपकडून श्रेष्ठींकडे गेलेल्या नावांपैकी सहा नावांवर शिक्का मुहूर्त होणार आहे. रात्री उशिरा शहरात दाखल झालेले पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत त्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे भाजपने अद्याप कोणत्याही इच्छुकाला अर्ज दिलेल्या नसून नाव निश्चिती झाल्यानंतरच संबंधित उमेदवाराला अर्ज दिला जाणार आहे ठाकरे गटाची शिवसेना आणि काँग्रेस आमने-सामने मिळालेल्या माहितीनुसार पक्षीय तोलिक बाळा नुसार ठाकरे गटाची शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आल्याने त्यांना दोन जागांवर संधी आहे. यातील एका जागेसाठी पक्षाचे वरिष्ठ नेते दत्ता गायकवाड यांचे पुत्र हेमंत कुमार गायकवाड यांचे नाव निश्चित झाल्याचे समजते तर दुसऱ्या जागेसाठी ठाकरे गटाच्या शिवसेनेचे तीन आणि काँग्रेसचे चार या बळानुसार अतिरिक्त नगरसेवक देता येईल त्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे काँग्रेस पक्षाला दोन वर्ष स्थायी समिती आणि दोन वर्ष विषय समिती असे ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या कोट्यातून देण्याचा करार झालेला आहे. त्यामुळे आता या जागेवर ठाकरे गटाने दावा केला आहे. मात्र काँग्रेस कडून देखील मोठ्या प्रमाणात इच्छुक असून यामध्ये खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांचे पुत्र गौरव बच्छाव, प्रदेशाध्यक्ष शरद आहेर माजी शहर अध्यक्ष आकाश छाजेड, विजय राऊत, कुसुमताई चव्हाण आदींनी दावेदारी केली आहे. तर ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून संजय चव्हाण, डीजी सूर्यवंशी, चारुशीला आणि बाबासाहेब गायकवाड यांच्याबरोबर राहुल दराडे, कृषी वर्मा, मयूर परदेशी, शैलेश सूर्यवंशी, याची नावे चर्चेत आहेत. पण काँग्रेसची आणि ठाकरे गटातील हा अद्याप वाद सुटलेला नाही. त्यामुळे काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेत अंतर्गत नाराजी असल्याची चर्चा असून काँग्रेस कडून गौरव बच्छाव तसेच शरद आहेर प्रबळ दावेदार मानले जात आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार या संदर्भात प्रदेशाध्यक्षांकडे बैठक घेऊन निराकारण करण्यात येईल असे सांगण्यात आले. मात्र ठाकरे गटाच्या शिवसेनेने इन्कार केला असून काँग्रेसचे शहराध्यक्ष बबलू खैरे यांनी तर आपण अध्यक्ष होण्यापूर्वी महापालिकेतील जागा वाटपावर काय ठरले याबाबत माहिती नाही. मात्र चर्चेतून तोडगा काढण्यात येईल असे सांगितले तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नेते पराभूत आणि माजी नगरसेवक विरुद्ध कार्यकर्ते असे वातावरण आहे ज्यांना संधी मिळाली किंवा जे नेते आहेत त्यांना कायम संधी द्यायची काय ? पक्षासाठी लढणाऱ्या अन्याय कार्यकर्त्यांना कधी अशी पदे मिळणार ?असे प्रश्न आहे विशिष्ट व्यक्तींसाठीच वरिष्ठ नेत्यांकडे नावे कळवली जातात अशा तक्रारींचा सूर आहे


![]()












