समस्या सोडविण्यावर भर, गिते यांची ग्वाही

नाशिक : नासिक मध्य मधील ठाकरे गटाच्या शिवसेनेचे उमेदवार वसंत गीते यांनी सराफ बाजारातील सुवर्णकार बांधवांची सदिच्छा भेट घेतली सराफ बाजारातील विविध अडचणींची आपल्याला जाणीव असून या समस्यांचा आग्रह क्रमाने निपटारा करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही वसंत गीते यांनी दिली. सराफ बाजारात भेडसावणाऱ्या अडचणींचा गेल्या दहा वर्षात निपटारा झालेला नाही. या अडचणी आपल्याला न्यात असून निवडणुकीनंतर त्यांची अग्रक्रमाने सोडवणूक केली जाईल तसेच सराफ बाजाराला पुनरवैभव प्राप्त करून देण्यासाठी कार्यरत राहू असे अभिवचन गीते यांनी दिले याप्रसंगी विनायक पांडे माजी महापौर यतीन वाघ, बाळासाहेब कोकणे, बबलू खैरे, श्याम तांबोळी, तसेच नाशिक सराफ असोसिएशनचे गिरीश नवसे राजू कुलथे, राजेंद्र दिंडोरकर, कृष्णा नागरे, कृष्णा खालपकर राजेश नागरे, राजेंद्र भावसार, प्रशांत गुरव, नितीन नागरे, यांच्यासह सरापी कारागीर उपस्थित होते. दरम्यान गीते यांच्या प्रचारात रामवाडी हनुमानवाडी आदर्श नगर मोरे मळा परिसरातून शिवसैनिक तसेच महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी ढोल ताशांच्या गजरात प्रचार यात्रा काढली यावेळी उपनेते सुनील बागुल श्रमिक सेनेचे जिल्हाध्यक्ष अजय बागुल, महानगर प्रमुख मामासाहेब राजवाडे, बाळासाहेब पाठक, शंभू बागुल, गुलाब भोये, कैलास एकरे मनीषा एकरे, कीर्ती दरगोळे, बाळासाहेब कोकणे, पप्पू टिळे, दिलीप मोरे, संजय थोरवे, रवी साठे, यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते


![]()












