मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते शोभायात्रेचा शुभारंभ

नाशिक :महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य शोभायात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दांपत्याच्या सजीव देखाव्यांची बग्गीतून काढलेली मिरवणूक, आदिवासी कलाकारांचे लोक नृत्य, पालखी आणि पारंपारिक वेशभूषा करत वाजत गाजत निघालेल्या शोभायात्रेत नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. द्वारका परिसरात मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते श्रीफळ वाढून शोभा यात्रेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी भुजबळ म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्यक्रांती तर महात्मा फुलेंनी सामाजिक क्रांती घडवली. तसेच समाजात सामाजिक समता निर्माण करण्यासाठी महात्मा फुले यांचे योगदान महत्वपूर्ण असल्याचे भुजबळ यांनी नमूद केले. सामाजिक समता निर्माण करण्यासाठी काम केले त्यामुळे त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गुरु मानले. तर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी त्यांना खरा महात्मा असल्याची पदवी बहाल केली. असेही त्यांनी सांगितले. द्वारका परिसरातील महात्मा फुले यांच्या पुतळ्यापासून शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली शोभायात्रा गणेशवाडीतील फुले यांच्या पुतळ्यापर्यंत वाजत गाजत नेण्यात आली. घोडा गाडीच्या बग्गीनी सजलेल्या चित्र रथांमुळे या मिरवणुकीला खऱ्या अर्थाने रंगत आली तसेच पालखीतील महात्मा फुले यांची प्रतिमा तसेच आदिवासी कलाकारांचे लोकनृत्य आणि जिवंत देखावा पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी झाली होती. तब्बल 16 चित्ररथ या मिरवणुकीत सहभागी झाले होते.

यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर भारती पवार आ. सीमा हिरे, आ. देवयानी फरांदे, माजी नगरसेवक प्रकाश लोंढे शहराध्यक्ष रंजन ठाकरे भाजपचे लक्ष्मण सावजी प्रशांत जाधव अनिल जाधव तसेच पदाधिकारी नानासाहेब महाले, प्राध्यापक बाळासाहेब पिंगळे, रमेश पिंगळे, शंकरराव पिंगळे प्रा. अशोक सोनवणे, दिलीप खैरे ,बाळासाहेब कर्डक, महेश हिरे , अंबादास खैरे, तेजश्री काठे, शशी हिरवे, समाधान जेजुरकर, शरद मंडलिक, दीपक मौले, आधी पदाधिकारी उपस्थित होते.


![]()











