महत्वाची खाती शिवसेनेकडे जाण्याची शक्यता

नाशिक : विधानसभेत छप्पर फाड यश मिळाल्यानंतर महायुती मध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण ? याबाबत रस्सीखेच सुरू असतानाच मुख्यमंत्रीपदाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा निर्णय भाजपप्रमाणे आम्हालाही मान्य असेल असे विधान खुद्द काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्यानंतर आता भाजपला मुख्यमंत्री पद मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून त्यामुळे पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून परतण्याचा मार्गावर आहेत. मात्र शिंदे गटाच्या वरिष्ठ नेत्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार गृहमंत्री पदावर शिंदे गटाच्या शिवसेनेने दावा ठोकला असून उपमुख्यमंत्री, सहकार गृहमंत्री पद हे महत्वाची खाती शिंदे गटाच्या शिवसेनेकडे जाण्याची शक्यता असून उपमुख्यमंत्री शिंदे गटाच्या शिवसेनेकडे गेल्यास एकनाथ शिंदे यांचे खास आणि विश्वासू असलेले दादा भुसे यांचे नाव चर्चेत असल्याचे कळते आहे. दादा भुसे यांनी मालेगाव बाह्य मतदारसंघाततुन सलग पाचव्यांदा विधानसभेत पाय ठेवला आहे. तर भुसे यांनी धुळ्यासह नाशिकचे देखील पालकमंत्री पद भूषविले आहे त्याचबरोबर शिंदे, ठाकरे, फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मंत्रीपदावर देखील होते .महत्वाचे म्हणजे दादा भुसे यांचा धर्मवीर आनंद दिघे यांच्याबरोबर जिव्हाळ्याचे संबंध होते .अडचणीच्या काळात दादा भुसे हे एकनाथ शिंदें बरोबर उभे राहिल्याने दादा भुसे यांच्याकडे उपमुख्यमंत्री पद जाण्याची दाट शक्यता आहे. असे झाल्यास छगन भुजबळ यांच्यानंतर नाशिक जिल्ह्यात दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री दादा भुसे असतील. तर नगरविकास आणि गृह खाते एकनाथ शिंदे यांच्याकडे जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे कोणती खाती कोणत्या पक्षाकडे जाण्याची शक्यता ? शिवसेनेकडे – गृहमंत्री,नगरविकास, उद्योग, आदिवासी,एमएसआरडीसी, पाणीपुरवठा भाजपाकडे–मुख्यमंत्री,सामाजिक बांधकाम, जलसंपदा,वैद्यकीय, आरोग्य,उच्चशिक्षण,ऊर्जा, सहकार,वने राष्ट्रवादीकडे -अर्थमंत्रालय, महसूल, कृषी खाते, ग्रामविकास, महिला बालविकास

![]()












