शेवटपर्यंत माघारीसाठी नेत्यांची धावपळ

नाशिक :जिल्ह्यातील मतदारसंघात आज माघारीसाठी शेवटचा दिवस असल्याने नासिक सह राज्याचे लक्ष लागून होते. आजचा दिवस महाआघाडी व महायुतीसाठी कसोटीचा ठरला यामध्ये काही दिग्गजांनी माघार घेतली तरी या सर्व घडामोडींमध्ये नाशिक मध्ये शांतिगिरी महाराज यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय कायम ठेवल्याने महायुतीची डोकेदुखी वाढणार आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे निवृत्ती अरिंगळे यांनी अर्ज मागे घेतला आहे. अजित पवार यांनी त्यांची फोनवरून समजूत काढली त्यानंतर त्यांनी अर्ज मागे घेतला. त्याचबरोबर ठाकरे गटातून शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणारे विजय करंजकर यांनी देखील माघार घेतली. भाजप नेते अनिल जाधव यांच्या माघारीसाठी शेवटच्या मिनिटाला महायुतीच्या नेत्यांची धावपळ झाली अवघे काही मिनिट शिल्लक असताना अनिल जाधव जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले आणि त्यांनी माघार घेतली. त्यामुळे आता खरी लढत ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे शिंदे गटाच्या शिवसेनेचे हेमंत गोडसे अपक्ष शांतिगिरी महाराज वंचित बहुजन आघाडीचे करण गायकर यांच्यात होणार आहे .


![]()












