शरद पवार, राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यासह इतर नेते मैदानात

नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा जोर धरू लागला असून सर्वच नेते आप-आपल्या पैलवानांसाठी निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. याची सुरवात देखील झाली असून शुक्रवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा नाशिकच्या तपोवनात पार पडली त्याचदिवशी सिडको परिसरात आदित्य ठाकरे यांची देखील सभा झाली तर आज (शनिवारी) सिडको -सातपूर परिसरात छत्रपती संभाजी राजे यांचा प्रचार दौरा पार पडला तर दुपारी तुपसाखरे लॉन्स परिसरात खा संजय राऊत यांनी सभेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तर संध्याकाळी सातपूर परिसरात राऊत यांची जाहीर सभा झाली. त्याचबरोबर मनसेचे प्रकाश महाजन यांची पाथर्डी परिसरात सभा झाली .त्यानंतर मंगळवारी शरद पवार हे नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. ते नाशिक जिल्ह्यात येणार असून कळवण येथे त्यांची पहिली सभा होणार आहे. त्यानंतर दिंडोरी आणि सिन्नर तसेच येवला मतदारसंघ अशा लागोपाठ त्यांच्या सभा होणार आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरे यांची नाशिक येथील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानात सभा होणार आहे. तर 16 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे नाशिकमध्ये येणार असून त्यांची सिडकोतील पवन नगर आणि सातपूर या भागांमध्ये सभा होणार असल्याचे समजते .त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे यांच्या देखील सभा होण्याच्या शक्यता आहेत. तर1 कॉग्रेस पक्षाचे नेते नाना पटोले, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या देखील सभांचे नियोजन आहे. त्याचबरोबर शहरात महत्वाच्या ठिकाणी छोट्या सभा होणार असल्याचे समजते.


![]()












