अनैतिक संबंधातून मावस भावानेच दगडाने ठेचून खून केल्याचा संशय ?

नाशिक : पांडवलेणी परिसराच्या मागील बाजूस असलेल्या खत प्रकल्पाजवळ एका निर्जन ठिकाणी एका तरुणाचा मूर्तदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. त्याच्या पॅन्टच्या खिशात सापडलेल्या वाहन चालविण्याच्या लायसन वरून त्याची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले आहे एकीकडे निवडणुकीच्या धामधुमीत पोलीस व्यस्त असताना इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला मयताचे नाव योगेश सुभाष बत्तासे (वय 32) असल्याचे समजते. खत प्रकल्पाच्या कामगाराला हा मूर्तदेह नजरेस पडला असताना त्याने इंदिरानगर पोलीस ठाण्याला याची माहिती दिली यानंतर माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमाने यांच्यासह इंदिरानगर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मयताच्या डोक्यावर दगडाने प्रहार करून ठार मारल्याचे प्रथमदर्शनी समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. मारेकऱ्यांनी मयत तरुणाचा मोबाईल देखील दगडाने ठेचून टाकल्याचे आढळून आले. संशयितांचा माग काढण्यासाठी गुगल डॉग ला पाचारण करण्यात आले. गुगलने घटनास्थळाहुन खत प्रकल्पाच्या दिशेने मुख्य गौळाणे रस्त्यापर्यंत माग दाखविला. योगेशचा खून अनैतिक संबंधातुन झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून पोलिसांनी संशयित कृष्णा बोराणे, व सिद्धार्थ आहिरे या दोघांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये मयत योगेशच्या मावस भावाचा संबंध असल्याचे समजते. या घटनेत किमान चार ते पाच संशयित मारेकरी असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. योगेश हा अंबड वसाहतीत भाडेतत्त्वावर खोली घेऊन राहत होता त्याची पत्नी व मावसभावासोबत काही महिन्यांपासून रहात होता. या प्रकरणात इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.


![]()












