मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निशाण्यावर पवारांसह उद्धव ठाकरे

नाशिक : नासिक पश्चिम मतदार संघातील मनसेचे उमेदवार दिनकर पाटील, प्रसाद सानप, काशिनाथ मेंगाळ, मोहिनी जाधव, योगेश सूर्यवंशी, यांच्या प्रचारासाठी सातपूर मधील शिवजन्ममहोत्सव मैदानावर राज ठाकरेंची सभा झाली. या सभेला संबोधित करताना राज ठाकरेंनी शरद पवारांसह उद्धव ठाकरे यांनाही लक्ष केले. राज्यात आरक्षणाचा विषय नाहक तापविला जात आहे सर्वच पक्ष नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे मुद्दामहून डोळेझाक करीत असल्याचे सांगून राज यांनी राज्यातील प्रत्येक प्रकल्पात भूमिपुत्रांनाच नोकरी देण्याची मागणी केली. मंदिरे उभारण्यापेक्षा गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्याची मागणी त्यांनी केली . मला लाल दिव्याची हाऊस नसल्याचे सांगून राज यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली तुम्हाला मागील निवडणुकीत मतदारांनी युती म्हणून निवडून दिले आणि तुम्ही मुख्यमंत्री पदासाठी ज्यांना आयुष्यभर विरोध केला त्यांच्या मांडीवर जाऊन बसलात हा मतदारांचा अवमान असून त्याचा हिशेब मतदार या निवडणूक घेतील असा हल्लाबोल राज यांनी उद्धव यांच्यावर केला. एकदा तरी सत्ता हाती द्या महाराष्ट्रात नवनिर्माण करून दाखवीतो. त्याबरोबर नाशिक मध्ये आयटी पार्क उभारल्याशिवाय शांत बसणार नाही अशी साद मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सातपूर व सिडको येथील प्रचार सभेत मतदारांना घातली. पाच वर्षात नाशिकचा विकास केला नासिक महापालिकेत मनसेची सत्ता पाच वर्षे होती या काळात नाशिकच्या झालेला विकास महाराष्ट्रातील एकही शहराचा आत्तापर्यंत झाला नसल्याचा दावा राजांनी केला नाशिककरांना गंगापूर धरणातील पाणी कमी पडणार होते म्हणून मुकणे धरणातून थेट पाईपलाईन टाकून नाशिककरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न पुढील 50 वर्ष मार्गी लावला आहे बॉटनिकल गार्डन कारंजे यासारखी कामे नाशिकमध्ये केली आहेत नाशिकचे सुसज्ज रस्ते त्यावेळी आम्ही केल्याचा दावा ठाकरे यांनी केला



![]()












