पूर्व मतदारसंघात राहुल ढिकलेंचा झंझावात

नाशिक : पूर्व मतदार संघातील विकासाचा चेहरा असलेला आमदार म्हणून प्रसिद्ध असलेल्या महायुतीचे भाजपचे उमेदवार आमदार अँड राहुल ढिकले यांनी जेलरोड नाशिक रोड परिसरात निर्माण केलेल्या प्रचाराच्या वादळाने आणि आक्रमक शैलीने विरोधकांना धडकी भरली आहे आमदार ढिकले यांच्या प्रचार नाशिक पूर्व मतदार संघातील जेलरोड, नाशिक रोड परिसरात श्री संत नरहरी भागात प्रचार सभा पार पडली. व्यासपीठावर नाशिक रोड विभागाचे माजी सभापती विशाल संगमनेरे, माजी नगरसेवक दिनकर आढाव, शरद मोरे ,सचिन हांडगे, मीराबाई हांडगे, सुरेखा निमसे, कुंदा शहाणे, शंकर बोराडे, अरुण माळवे, राहुल गायकवाड आदी उपस्थित होते. दादागिरी करणाऱ्यांनो सावधान जर तुम्ही जनतेला त्रास दिला तर तुमचा सामना माझ्याशी आहे मी फक्त वकील नाही तर पैलवानही आहे कायद्याची ताकद आणि शरीराची बळकटी दोन्ही माझ्याकडे आहेत. हिम्मत असेल तर समोर या अशा शब्दात ढिकले यांनी विरोधकांना आवाहन दिले आहे. वेळ आले की खोटेपणाचा बुरखा फाडतोच असे नमूद करत जेल रोड वासीयांवर अन्याय सहन करणार नाही. असा इशाराही त्यांनी विरोधकांना दिला यावेळी सोनार समाजाला उद्देशून ढिकले यांनी आदर व्यक्त केला तुम्हाला खऱ्या सोन्याची पारख आहे. खऱ्या खोट्याची जाण आहे. तुम्ही योग्य उमेदवाराला निवडून आणाल यात शंका नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर जेलरोड परिसरातील गोकुळधाम आपारमेंट, भैरवनाथ नगर, प्रगती नगर, विमल नगर, ब्रिज नगर, गवा चौक, ढिकले नगर, जयत नगर, आदी प्रभाग 17 व 18 परिसरात ढिकले यांनी प्रचार दौरा केला यात मतदारांनी ठिकठिकाणी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले यावेळी ढिकले म्हणाले ही लढाई धनशक्ती विरोधात जनशक्तीची असून आपण जनशक्तीलाच विजयी कराल

![]()












