महाविकास आघाडीत पश्चिम,मध्य, देवळाली मतदारसंघ तिन्ही ठाकरे गटाच्या शिवसेनेकडे

नाशिक : नाशिकरोड-देवळाली मतदार संघ महाविकास आघाडीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळणार असल्याची जोरदार चर्चा होती मात्र आज अखेर देवळाली मतदारसंघ हा ठाकरे गटाच्या शिवसेनेला सुटला असल्याचे समजते.देवळाली ची जागा शिवसेना ठाकरे गटाला मिळावी म्हणून गेल्या पाच ते सहा दिवसापासून देवळाली मतदारसंघातील शिवसेनेचे पदाधिकारी मुंबई मध्ये तळ ठोकून बसले आहे परिणामी आज झालेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेअंती सदरची जागा ही शिवसेना ठाकरे गटाला मिळाली असल्याचे वृत्त असून या जागेवर माजी आमदार योगेश घोलप यांना एबी फॉर्म देण्यात आला आहे. म्हणजेच नाशिक शहरातील पश्चिम, मध्य आणि देवळाली मतदार संघाच्या तीनही जागा खेचण्यात ठाकरे गटाच्या शिवसेनेला यश आल्याचे चित्र आहे मध्यंतरी देवळाली मतदारसंघ शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जाणार असल्याच्या चर्चेमुळे तुतारी वाजवण्यासाठी अनेक नेत्यांनी मुंबई येथे जाऊन शरद पवार यांच्या भेटी घेतल्या यामध्ये ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नेते देखील होते. त्यामुळे आता मध्य मतदारसंघातून ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून वसंतराव गिते, पश्चिम मतदारसंघातून सुधाकर बडगुजर तर देवळाली मतदारसंघातून योगेश घोलप उमेदवार असणार आहेत.

![]()












